कितीही पैसा कमवा, खिसा राहतो नेहमीच रिकामी? हातावरच्या 'या' रेषा करतात कंगाल!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अनेकदा आपण पाहतो की काही लोक खूप मेहनत करतात, बक्कळ पैसाही कमावतात, पण त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. खर्च इतके वाढतात की बचत करणे कठीण होऊन बसते.
advertisement
1/7

अनेकदा आपण पाहतो की काही लोक खूप मेहनत करतात, बक्कळ पैसाही कमावतात, पण त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. खर्च इतके वाढतात की बचत करणे कठीण होऊन बसते. हस्तरेषा शास्त्रानुसार, आपल्या तळहातावरील काही विशिष्ट रेषा आणि चिन्हे आपल्या आर्थिक नियोजनातील उणिवा किंवा 'धनहानी' दर्शवतात.
advertisement
2/7
हस्तरेषा शास्त्रानुसार, हातातील 'धन रेषा' आणि 'भाग्य रेषा' यांची स्थिती व्यक्तीच्या आर्थिक भविष्याबद्दल बरेच काही सांगते. ज्याप्रमाणे स्पष्ट आणि सरळ रेषा प्रगती दर्शवतात, त्याचप्रमाणे तुटलेल्या किंवा वाकड्या-तिकड्या रेषा पैशांच्या बाबतीत येणाऱ्या अस्थिरतेचे संकेत देतात. या रेषा केवळ आपले नशीबच नाही, तर आपल्या खर्च करण्याच्या सवयी आणि स्वभावही अधोरेखित करतात.
advertisement
3/7
तुटलेली किंवा अस्पष्ट धन रेखा: हस्तरेषा शास्त्रानुसार, करंगळीच्या खाली असलेल्या बुध पर्वतावर उभी रेषा असते, जिला 'धन रेषा' म्हणतात. जर ही रेषा तुटलेली, अस्पष्ट किंवा नागमोडी असेल, तर अशा व्यक्तीकडे पैसा येतो, पण तो फार काळ टिकत नाही. अशा लोकांच्या आयुष्यात आर्थिक चढ-उतार सतत सुरू असतात.
advertisement
4/7
बोटांमधील फटी: जेव्हा तुम्ही तुमचा तळहात समोर धरता आणि बोटे एकत्र जुळवता, तेव्हा जर बोटांच्या मुळाशी मोठी फट दिसत असेल, तर ते अशुभ मानले जाते. असे मानले जाते की, ज्यांच्या बोटांमध्ये अशा फटी असतात, त्यांच्या हातातून पैसा पाण्यासारखा वाहून जातो. अशा व्यक्तींना बचतीचे महत्त्व समजत नाही आणि ते अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
advertisement
5/7
भाग्य रेषेवर 'क्रॉस' किंवा 'जाळे' असणे: मनगटापासून सुरू होऊन मधल्या बोटाकडे जाणारी रेषा म्हणजे भाग्य रेषा. जर या रेषेवर क्रॉस चिन्ह असेल किंवा रेषा अनेक ठिकाणी कापली गेली असेल, तर करिअरमध्ये वारंवार अडथळे येतात. मेहनतीचे फळ वेळेवर मिळत नाही आणि अनपेक्षित खर्च उभे राहतात.
advertisement
6/7
तळहातावर अनेक बारीक रेषांचे जाळे: जर तुमच्या तळहातावर खूप जास्त बारीक-सारीक रेषांचे जाळे असेल, तर ते विस्कळीत विचारांचे प्रतीक आहे. अशा व्यक्तींचे मन एका कामात लागत नाही. ते गुंतवणुकीचे चुकीचे निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. अशा लोकांसाठी 'धन संचय' करणे हे एक मोठे आव्हान ठरते.
advertisement
7/7
कमकुवत 'गुरु पर्वत': तर्जनीच्या खाली असलेला भाग म्हणजे गुरु पर्वत. जर हा भाग दबलेला किंवा सपाट असेल, तर ते कमकुवत नियोजनाचे लक्षण आहे. गुरु हा ज्ञानाचा आणि धनाचा कारक आहे. गुरु पर्वत कमकुवत असल्यास व्यक्तीमध्ये पैशांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता कमी असते, ज्यामुळे संपत्ती साठवण्यात अडचण येते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
कितीही पैसा कमवा, खिसा राहतो नेहमीच रिकामी? हातावरच्या 'या' रेषा करतात कंगाल!