Bigg Boss : बिग बॉस विजेता अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यात वादळ, घेतोय घटस्फोट? म्हणाला, 'माझी बायको...'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Celebrity Divorce : बिग बॉसचा विजेता ठरलेला हा अभिनेता, ज्याच्या बायकोने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होऊ लागली.
advertisement
1/5

बिग बॉस ज्यात कित्येकांची नाती जुळली तर काहींची तुटलीही. असाच एक बिग बॉस विजेता ज्याचं नातं तुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. बिग बॉसचा विनर ठरलेला हा अभिनेता ज्याच्या वैवाहिक आयुष्यात वादल आल्याचं म्हटलं जातं. त्याचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट होणार असल्याची गेले कित्येक दिवस सुरू होती. अखेर या चर्चेचं सत्य समोर आलं आहे.
advertisement
2/5
ही बातमी आहे बिग बॉस 19 चा विजेता ठरलेला अभिनेता गौरव खन्ना याची. गौरव खन्नाने 2016 मध्ये आकांक्षा चमोलाशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 10 वर्षे झाली आहेत. आता त्यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा होती. आकांक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे या चर्चा होऊ लागल्या. आता गौरवने खरं काय ते सांगितलं आहे.
advertisement
3/5
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना गौरव म्हणाला, "त्याच्या पत्नीने शेअर केलेली ती पोस्ट त्यांच्या प्रोजेक्टची प्रमोशनल पोस्ट होती. त्याचा त्यांच्या घटस्फोटाशी काहीही संबंध नव्हता. ती पोस्ट तिच्या वेब सीरीजच्या प्रमोशनचा भाग होती. पण लोकांनी त्याचा असा अर्थ लावला की जणू काही आम्ही वेगळे होणार आहोत"
advertisement
4/5
"आकांक्षा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे आणि मी तिला प्रत्येक पावलावर पूर्ण पाठिंबा देतो. आम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर करतो आणि नेहमीच करत राहू. एक कपल म्हणून आम्ही एकत्र खूप आनंदी आहोत", असं तो म्हणाला.
advertisement
5/5
दरम्यान आकांक्षानेही याआधी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. "आमच्या लग्नात कोणताही त्रास नाही. माझ्या पोस्टचा गौरवशी काहीही संबंध नव्हता. मी सोशल मीडियावर वैयक्तिक बाबींवर चर्चा करत नाही. माझी पोस्ट माझ्या आगामी मालिकेच्या प्रमोशनसाठी होती", असं ती म्हणाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss : बिग बॉस विजेता अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यात वादळ, घेतोय घटस्फोट? म्हणाला, 'माझी बायको...'