TRENDING:

T20 World Cup मध्ये मोठा ट्विस्ट, 10700 किमीवरून ऑस्ट्रेलियाने थेट कॅप्टनच बोलवला! सुपर 8 आधी कांगारूंचा मोठा गेम

Last Updated:
Steve Smith joins Australia squad : सोमवारी संध्याकाळी 7 वाजता कॅन्डी येथील पल्लेकेले स्टेडियमवर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा थ्रिलर मॅच रंगणार आहे.
advertisement
1/7
T20 World Cup मध्ये मोठा ट्विस्ट,ऑस्ट्रेलियाने थेट कॅप्टनच बोलवला!
टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 मध्ये सोमवारी संध्याकाळी 7 वाजता कॅन्डी येथील पल्लेकेले स्टेडियमवर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अतितटीचा मॅच खेळवली जाणार आहे.
advertisement
2/7
टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील ग्रुप 'बी' मधील सर्वात महत्त्वाच्या मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियन टीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या निर्णायक लढतीपूर्वी ऑस्ट्रेलियाने आपला अनुभवी खेळाडूचा समावेश केला आहे.
advertisement
3/7
स्टीव्ह स्मिथला वेगवान बॉलर जोश हेझलवूडच्या जागी टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. खरं तर, स्मिथला कॅप्टन मिचेल मार्शसाठी बॅकअप म्हणून पाठवण्यात आलं होतं, कारण मार्शला प्रॅक्टिस सेशनमध्ये दुखापत झाली होती.
advertisement
4/7
दुखापतीमुळे मार्श सुरुवातीच्या दोन मॅचेस खेळू शकला नव्हता. रविवारी स्मिथने कॅन्डीमध्ये टीमसोबत कसून सराव केला असून, तो आता निवडीसाठी उपलब्ध आहे. निवड समितीचे सदस्य टोनी डोडेमेड यांनी याची माहिती दिली.
advertisement
5/7
आयसीसीच्या नियमानुसार, मॅच सुरू होण्यापूर्वी 24 तास आधी टीममध्ये बदल करणं आवश्यक असतं. मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिस यांच्या फिटनेसबाबत अद्याप साशंकता असल्याने स्मिथला संधी मिळाली आहे.
advertisement
6/7
श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या मॅचमध्ये स्मिथला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. कॅप्टन मिचेल मार्श फिट होऊन ओपनिंगला येण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.
advertisement
7/7
मात्र, जर मार्श पूर्णपणे फिट नसेल, तर स्मिथचे पुनरागमन निश्चित मानले जाईल आणि स्मिथकडे थेट कॅप्टन्सी दिली जाण्याची शक्यता आहे. स्मिथने अलीकडील बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त कामगिरी करून दाखवली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup मध्ये मोठा ट्विस्ट, 10700 किमीवरून ऑस्ट्रेलियाने थेट कॅप्टनच बोलवला! सुपर 8 आधी कांगारूंचा मोठा गेम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल