TRENDING:

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा, महापौरांनी केली घोषणा; पण, प्रशासनाची रडारड सुरू!

Last Updated:

गेल्या दोन वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेच्या पाणीपट्टीमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. जर यावर्षी सुद्धा पाणी पट्टीमध्ये वाढ न केल्यास महापालिकेकडून वाढता खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर पालिकेच्या महापौरपदी रितू तावडे बसल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली होती. ती घोषणा म्हणजे, मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ केली जाणार नाही. पण या घोषणेनंतर महानगर पालिकेच्या जल अभियंता विभागातल्या वरिष्ठ अभियंत्यांनी पाणीपट्टीमध्ये वाढ न करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेच्या पाणीपट्टीमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. जर यावर्षी सुद्धा पाणी पट्टीमध्ये वाढ न केल्यास महापालिकेकडून वाढता खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.
मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
advertisement

महापालिकेच्या महापौर पदी रितू तावडे आल्यानंतर त्यांनी मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली होती. दरवर्षी पाणीपट्टीची काही टक्क्यांनी वाढ होते, गेल्या दोन वर्षांपासून ती झालेली नाही. ती यावर्षी सुद्धा होणार नसल्याचे रितू तावडे यांनी स्पष्ट केले. पण पाणीपट्टीची वाढ थांबवणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे वरिष्ठ जल अभियंत्यांचे म्हणणे आहे. जर यावर्षी सुद्धा पाणीपट्टीची वाढ केली नाही तर, जल विभागातला खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न अभियंत्यांनी मांडला आहे. जल अभियंता विभागातील खर्च, प्रशासन खर्च, प्रचालन आणि परिरक्षण खर्च, विद्युत खर्च, धरणातून होत असलेल्या पाणी उपसाचा खर्च इ. अशा अनेक खर्चांमध्ये दरवर्षी वाढ होते.

advertisement

महानगर पालिकेतल्या सर्व विभागांच्या खर्चाचा आढावा घेऊन प्रत्येक वर्षी 8 टक्के पर्यंत पाणीवाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने पालिका प्रशासनाला दिला आहे. त्याप्रमाणे आढावा घेऊनही वाढ करण्यात येते. महानगर पालिकेच्या महापौरांनी पाणीपट्टी वाढीला स्थगिती दिल्यामुळे जल अभियंत्यांना आणि विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. या सर्वांपुढे विभागातला सर्व खर्च कशापद्धतीने भागवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर महापौरांनी पाणीपट्टीच्या वाढीसाठी स्थगिती दिली, तर अन्य उत्पन्न स्त्रोत्रांतील पैसे काढावे लागतील, असे म्हणणे आहे. दिवसेंदिवस वाढता खर्च पाहता विभागाने मुदत ठेवी सुद्धा खर्च केल्या जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मन होईल तृप्त, फक्त 40 रुपयांत खा चविष्ट खिचा पापड, मुंबईत हे आहे ठिकाण
सर्व पहा

आता देखील पाणी पट्टीमध्ये वाढ न केल्यास पुढचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न पालिकेच्या पाणी विभागासमोर असेल, असा मुद्दा अभियंत्यांनी मांडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या पाणी पट्टीमध्ये वाढ न झाल्यामुळे महापालिकेचे सुमार एक हजार कोटींपर्यंतचे नुकसान झाले आहे. पाणीपट्टीमध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेणे मुंबई महापालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचा जाऊ शकतो.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईकरांना दिलासा, महापौरांनी केली घोषणा; पण, प्रशासनाची रडारड सुरू!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल