advertisement

Mumbai Food : मन होईल तृप्त, फक्त 40 रुपयांत खा चविष्ट खिचा पापड, मुंबईत हे आहे ठिकाण

Last Updated:

या खिचा पापडाची किंमत फक्त 40 रुपये आहे. कमी किमतीत, पोटभर आणि चवीदार असा हा पदार्थ भुलेश्वरमधील खाऊगल्लीची ओळख बनला आहे.

+
खाऊगल्लीमधील

खाऊगल्लीमधील ४० रुपयांत मिळणार तांदळाच्या पापडाचा हा पदार्थ खाल्ल आहे का ?

मुंबई : मुंबईमध्ये अनेक खाऊगल्ली आहेत. या खाऊगल्लींमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ केवळ खाण्यासाठी नाही, तर त्यांच्या चवीमुळे आणि तयार करण्याच्या पद्धतीमुळे वर्षानुवर्षे ओळखले जातात. अशाच खाऊगल्लींपैकी एक म्हणजे भुलेश्वरमधील खाऊगल्ली. भुलेश्वर मार्केट आणि मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या अगदी बाहेरच ही खाऊगल्ली लागते. इथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात आणि त्यामधील एक कायम चर्चेत असलेला पदार्थ म्हणजे खिचा पापड.
भुलेश्वरमध्ये मिळणाऱ्या या खिचा पापडसाठी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. गेल्या सुमारे पन्नास वर्षांत खाद्यसंस्कृतीत अनेक बदल झाले, नवे पदार्थ आले, नव्या चवी आल्या, तरीही हा पापड त्याच पद्धतीने आणि त्याच चवीने तयार केला जात आहे. त्यामुळे आजही हा पापड खाण्यासाठी लोक आवर्जून थांबतात.
advertisement
या खिचा पापडाची तयारी हीच त्याची खरी ओळख आहे. तांदळाचे पापड आधी भाजले जातात. गरम पापडावर तुपाचा थर दिला जातो. त्यानंतर कांदा, टोमॅटो, काकडी, कोबी अशा भाज्या बारीक चिरून पापडावर टाकल्या जातात. या भाज्या तिथेच कापल्या जात असल्यामुळे त्यांचा ताजेपणा जाणवतो.
यानंतर पापडावर हिरवी लसूण, पुदिना आणि कोथिंबीरची चटणी, लाल लसणाची चटणी तसेच शंकेश्वरी मिरचीपासून तयार केलेली लाल चटणी लावली जाते. यासोबतच हरभरा, मूग, वाटाणा अशा कडधान्यांचा एक थर दिला जातो. शेवटी वरून बारीक शेव पसरवून पापड पूर्ण केला जातो. हा संपूर्ण पापड ग्राहकांच्या समोरच तयार केला जातो.
advertisement
या खिचा पापडाची किंमत फक्त 40 रुपये आहे. कमी किमतीत, पोटभर आणि चवीदार असा हा पदार्थ भुलेश्वरमधील खाऊगल्लीची ओळख बनला आहे. या खाऊगल्लीमध्ये खिचा पापडसोबतच इतरही अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. तवा फ्राईड राईस, वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच तसेच विविध प्रकारच्या भेळी इथे मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांसाठी ही खाऊगल्ली थांबण्याचं ठिकाण ठरते.
advertisement
फास्टफूडच्या वाढत्या पर्यायांमध्येही भुलेश्वरमधील खिचा पापड आणि इथले इतर पारंपरिक स्ट्रीट फूड आजही तितक्याच आवडीने खाल्ले जातात. हीच गोष्ट या खाऊगल्लीला वेगळी ओळख देणारी ठरते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Mumbai Food : मन होईल तृप्त, फक्त 40 रुपयांत खा चविष्ट खिचा पापड, मुंबईत हे आहे ठिकाण
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement