advertisement

Saree Styling Tips : साध्या साडीला मॉडर्न आणि स्टायलिश लूक कसा द्यायचा? 'या' 5 फॅशन ट्रिक्स करतील तुमची मदत

Last Updated:

How to look Stylish and stunning in saree : एकाच पद्धतीने साडी नेसून आपल्याला बऱ्याचदा बोअर होऊ शकतं. म्हणूनच तुमच्या साध्या साडीलाही स्टायलिश आणि युनिक लूक देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

साडी स्टायलिंग टिप्स..
साडी स्टायलिंग टिप्स..
मुंबई : भारतीय स्त्रियांना साडी नेसायला फार आवडते. म्हणजे बहुतांश स्त्रियांना आवडतेच. स्टाईल कोणतीही असो. रोज नेसणं असो किंवा कधीतरी. मात्र साडी नेसायला प्रत्येक महिलेला आवडतेच. साडी नेसण्याची एक पारंपारीक पद्धत नसते. ती संस्कृती आणि आपापल्या पद्धतीनुसार बदलते. मात्र तरीही एक अशी पद्धत आहे जी नेसायला सोपी असते आणि बहुतांश बायका त्याच पद्धतीने साडी नेसतात.
पण एकाच पद्धतीने साडी नेसून आपल्याला बऱ्याचदा बोअर होऊ शकतं. म्हणूनच तुमच्या साध्या साडीलाही स्टायलिश आणि युनिक लूक देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही नेसलेली साडी बोरिंग अजिबात दिसणार नाही, तर उलट तुम्ही सर्वांमध्ये वेगळ्या आणि उठून दिसाल. चला पाहूया स्टायलिश साडी लूकसाठी काही टिप्स.
advertisement
ब्लाउजची निवड महत्त्वाची
तुमची साडी स्पेशल आणि स्टायलिश दिसावी असे तुम्हाला वाटतं असेल तर सर्वात महत्त्वाचा असतो म्हणजे त्यावरचा ब्लाउज. साडी कितीही साधी असली ती त्यावरचा ब्लाउज जर डिझायनर असेल तर. साडीचा लूक वाढतोच. म्हणूनच साडीवर नव्या स्टाईलचं आणि डिझायनर ब्लाउज घाला. याने तुम्हाला क्लासी लूक मिळेल.
वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीजने स्टाईल करा
तुमच्या साध्या साडीला स्टायलिश लूक येण्यासाठी ती वेगवगेळ्या अ‍ॅक्सेसरीजने तुम्ही सजवू शकता. सर्वात जास्त स्टायलिश वाटणारी अ‍ॅक्सेसरी म्हणजे बेल्ट. साडीसोबत बांधायचा एक बेल्ट तुमच्या साडीच लूक खूप वाढवू शकतो. साडीसोबत मॅचिंग बेल्ट, लेदर बेल्ट किंवा मेटल बेल्ट हल्ली ट्रेंडी आहे. तसेच स्टेटमेंट इअररिंग्ज, बांगड्या आणि अंगठ्या देखील तुम्ही वापरू शकता. हवे असल्यास हेव्ही नेकलेस किंवा टिकली तुमच्या लूकमध्ये आणखी भर घालते.
advertisement
वेगवेगळ्या पद्धतीने साडी स्टाईल करा
एकाच पद्धतीने साडी नसल्याने ते बोरिंग होऊ शकते. तर साडीच्या वेगवेगळ्या स्टाईल ट्राय करा. हल्ली सोशल मीडियावर एकच साडी तुम्ही वेगवेगळ्या स्टाईल कधी नेसू शकता. याबाबद्दल खूप माहिती उपलब्ध आहे. जसे की, मराठी स्टाईल, बंगाली स्टाईल, पँट-स्टाईल किंवा डबल पल्लू स्टाईलमध्ये तुम्ही साडी नेसू शकता. यामुळे फॅशनेबल आणि स्टायलिश लूक येईल.
advertisement
साडीच्या एका वेगळ्या स्टाईलसाठी तुम्ही इंस्टाग्रामवरील जगदीशा उपाध्याय यांचा हा व्हिडीओ पाहू शकता. ही स्टाइलदेखील तुम्हाला स्टनिंग लूक देऊ शकते.
advertisement
काही महत्त्वाच्या टिप्स
साडीचा लूक परफेक्ट बनवण्यासाठी योग्य चप्पल किंवा सॅन्डल आणि हेअर स्टाईल निवडणे आवश्यक आहे. या साध्या टिप्स साडीलाही सुंदर आणि आकर्षक लूक देतील.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Saree Styling Tips : साध्या साडीला मॉडर्न आणि स्टायलिश लूक कसा द्यायचा? 'या' 5 फॅशन ट्रिक्स करतील तुमची मदत
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement