प्रत्येक वेबसाइटवर तुम्ही Cookies Accept करता? प्रायव्हसी येऊ शकते धोक्यात
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्याच्या इंटरनेटच्या जगतात आपण विविध वेबसाइट्सवर व्हिजिट करत असतो. अशावेळी वेबसाइट Cookies तुमच्या ब्राउजिंग आणि डेटाला सेव्ह आणि ट्रॅक करते. यामुळेच कोणतीही गोष्ट करताना विचार करुन करणे गरजेचे असते.
advertisement
1/7

मुंबई : सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. अशावेळी एका छोटासा स्मार्टफोनमध्ये आपलं संपूर्ण जग सामावलं आहे. आपण विविध कामांसाठी यावर वेगवेगळ्या वेबसाइट ओपन करत असतो. वेबसाइट ओपन करताच Accept Cookies किंवा Reject वर आपण काहीही विचार न करता क्लिक करतो. आपल्याला वाटतं की, ही फक्त औपचारिकता आहे. मात्र खरंत पाहिलं तर हे तुमच्या डिजिटल प्रायव्हशीशी संबंधित मोठा निर्णय असतो.
advertisement
2/7
कुकीजच्या माध्यमातून वेबसाइट्स तुमची पसंत, सर्च हिस्ट्री आणि ऑनलाइन व्यवहार ट्रॅक करु शकते. अनेकदा डेटा जाहिरात कंपन्या आणि थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म्सपर्यंत पोहोचतो. अशावेली Accept किंवा Reject करणे किती योग्य आणि कधी काय निवडावे हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
advertisement
3/7
Cookies म्हणजे काय? : Cookies लहान-लहान टेक्स्ट फाइल्स असतात. ज्या कोणत्याही वेबसाइटवर व्हिजिट केल्यावर तुमच्या ब्राउजरमध्ये सेव्ह होतात.याचं काम तुमची लॉगिन माहिती, भाषा आवड आणि वेबसाइट सेटिंग्स लक्षात ठेवणे असते, जेणेकरुन पुढच्यावेळी साइट वेगाने ओपन होईल आणि तुम्हाला वारंवार डिटेल्स भराव्या लागू नयेत.
advertisement
4/7
प्रत्येक Cookie धोकादायक नसते. वेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी काही कुकीज आवश्यक असतात. मात्र, काही ट्रॅकिंग किंवा थर्ड पार्टी Cookies तुमचे ऑनलाइन वर्तन रेकॉर्ड करतात, ज्यामुळे तुमचे डिजिटल प्रोफाइल तयार होऊ शकते.
advertisement
5/7
Accept केल्याने काय धोका? : तुम्ही सर्व Cookies ज्यावेळी Accept करता, तेव्हा वेबसाइट तुमच्या ब्राउझिंग पॅटर्न, लोकेशन आणि आवडीच्या कंटेंटची माहिती मिळू शकते. यामुळे तुम्हाला पर्सनलाइज्ड जाहिराती दिसतात. मात्र यासह तुमचा डेटा शेयरिंगचा धोकाही वाढतो. अनेकदा ही माहिती थर्ड पार्टी कंपन्यांकडे पोहोचते. वेबसाइट सुरक्षित नसेल तर डेटा लीक झाला, तर तुमची माहिती चुकीच्या हातात पोहोचू शकते. यामुळे काहीही न वाचता Accept करणे धोकादायक ठरु शकते.
advertisement
6/7
प्रत्येक वेळी कुकीज Reject करणे योग्य आहे का? : बरेच लोक, त्यांच्या प्रायव्हसीच्या भीतीने, प्रत्येक वेबसाइटवरील कुकीज नाकारतात. यामुळे ट्रॅकिंग कमी होऊ शकते, परंतु काही वेबसाइट योग्यरित्या काम करू शकत नाहीत. तुम्हाला वारंवार लॉग इन करावे लागू शकते किंवा काही फीचर्स मर्यादित असू शकतात. सर्वोत्तम मार्ग म्हणजे सेटिंग्ज मॅनेज करा किंवा कस्टमाइझ करा पर्याय निवडणे. हे तुम्हाला फक्त आवश्यक कुकीजना परवानगी देते आणि ट्रॅकिंग किंवा मार्केटिंग कुकीज अक्षम करते. हा एक संतुलित आणि सुरक्षित मार्ग मानला जातो.
advertisement
7/7
सुरक्षित राहण्याची सोपी पद्धत : ऑनलाइन प्रायव्हसी टिकवून ठेवण्यासाठी ब्राउझर सेटिंग्समध्ये जाऊन Cookie कंट्रोल समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही थर्ड पार्टी Cookies नेहमीसाठी ब्लॉक करु शकता. वेळोवेळी ब्राउझिंग हिस्ट्री आणि Cookies क्लियर करणेही चांगला उपाय आहे. सोबतच विश्वासार्ह वेबसाइट्सवरच आपली माहिती शेअर करा आणि संशयित साइट्सपासून दूर राहा. डिजिटल जगात एक लहानसा क्लिकही मोठा परिणाम करु शकतो. यामुळे पुढच्यावेळी Accept किंवा Reject करण्यापूर्वी क्षणभर थांबून विचार करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
प्रत्येक वेबसाइटवर तुम्ही Cookies Accept करता? प्रायव्हसी येऊ शकते धोक्यात