TRENDING:

Elephant Fact : ‘दाखवायचे वेगळे, खायचे वेगळे’… पण हत्तीचे दात किती? 99 टक्के लोकांना माहित नाही हे Fact

Last Updated:
मानवाला जसे 32 दात असतात, तसंच हत्तीच्या जबड्याचं गणितही अत्यंत रंजक आहे. चला तर मग, या अवाढव्य प्राण्याच्या दातांचं 'इनसाईड' रहस्य उलगडूया.
advertisement
1/7
Elephant Fact : ‘दाखवायचे वेगळे, खायचे वेगळे’… पण हत्तीचे दात किती? 99 टक्के लोकांना माहित नाही हे Fact
आपण व्यवहारात अनेकदा एक म्हण वापरतो "हत्तीचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे!" ही म्हण सहसा कोणाच्या दुटप्पी स्वभावावर टीका करण्यासाठी वापरली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, निसर्गात खरोखरच हत्तीचे दात कसे असतात? जेव्हा आपण हत्ती पाहतो, तेव्हा आपल्याला बाहेर आलेले दोन मोठे पांढरे सुळे Tusks दिसतात. साहजिकच, लहान मुलं असोत वा मोठे, विचारलं तर उत्तर मिळतं 'हत्तीला दोनच दात असतात.'
advertisement
2/7
पण थांबा, हे उत्तर अर्धसत्य आहे. मानवाला जसे 32 दात असतात, तसंच हत्तीच्या जबड्याचं गणितही अत्यंत रंजक आहे. चला तर मग, या अवाढव्य प्राण्याच्या दातांचं 'इनसाईड' रहस्य उलगडूया.
advertisement
3/7
1. दोन की सव्वीस? काय आहे खरं गणित?तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण एका पूर्ण वाढ झालेल्या हत्तीला एकूण 26 दात असतात. आपल्याला बाहेर दिसणारे ते दोन मोठे सुळे म्हणजे हत्तीच्या वरच्या जबड्यातील इन्सायझर्स दातांचे रूपांतर असतं. हे दात केवळ संरक्षणासाठी किंवा झाडांची साल काढण्यासाठी वापरले जातात. मग हत्ती जेवण कसं चघळतो? तर त्यासाठी त्याच्या तोंडाच्या आत 24 दात लपलेले असतात.
advertisement
4/7
2. तोंडाच्या आतील 'चघळण्याचे' यंत्रहत्तीला जेवण चघळण्यासाठी दोन्ही जबड्यात प्रत्येकी 6 दात असतात. म्हणजेच वरच्या जबड्यात १२ आणि खालच्या जबड्यात 12, असे एकूण 24 चघळण्याचे दात. हे दात आकाराने खूप मोठे आणि मजबूत असतात, ज्याच्या साहाय्याने हत्ती कडक फांद्या आणि गवत सहज बारीक करू शकतो.
advertisement
5/7
3. दात पडले तर काय? हत्तीकडे आहे 'सहा' वेळा चान्समाणसाला आयुष्यात दोनदा दात येतात दुधाचे दात आणि कायमस्वरूपी दात. एकदा कायमस्वरूपी दात पडला की पुन्हा येत नाही. पण हत्तीच्या बाबतीत निसर्ग खूपच उदार आहे. हत्तीचे 24 चघळण्याचे दात त्याच्या जीवनकाळात चक्क 6 वेळा पुन्हा येतात. जेव्हा जुने दात घासले जातात किंवा पडतात, तेव्हा मागून नवीन दात पुढे सरकतात आणि जुन्या दातांची जागा घेतात. हत्तीच्या आयुष्यात ही प्रक्रिया सहावेळा घडते.
advertisement
6/7
4. हत्तीच्या सुळ्यांची किंमत आणि महत्त्वबाहेर दिसणारे दोन सुळे हे हत्तीच्या सौंदर्यात भर टाकतातच, पण ते त्याच्या अस्तित्वासाठीही महत्त्वाचे आहेत. हत्ती या दातांचा वापर जमिनीतून मूळं खोदण्यासाठी, झाडं पाडण्यासाठी आणि शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी करतो. दुर्दैवाने, याच दातांच्या (हस्तीदंत) तस्करीमुळे हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते, जी कायदेशीररीत्या गुन्हा आहे.
advertisement
7/7
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हत्ती पहाल किंवा ही म्हण ऐकाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच आठवेल की हत्तीचे दाखवण्याचे दोन दात सोडून आत अजून 24 दातांचा कारखाना सुरू असतो. निसर्गाची ही किमया खरोखरच थक्क करणारी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Elephant Fact : ‘दाखवायचे वेगळे, खायचे वेगळे’… पण हत्तीचे दात किती? 99 टक्के लोकांना माहित नाही हे Fact
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल