TRENDING:

Car AC मधून दुर्गंधी येतेय? डोंट वरी, काही ट्रिक्सने लगेच होईल दूर

Last Updated:
उन्हाळ्यात कार एसी हा खुप जास्त महत्वाचा असतो. कारण गाडी उन्हामुळे तापलेली असते अशावेळी आतील उष्णता खुप वाढते. ज्यामुळे कार एसी प्रत्येकजण वापरतो.
advertisement
1/8
Car AC मधून दुर्गंधी येतेय? डोंट वरी, काही ट्रिक्सने लगेच होईल दूर
कारमध्ये एसी वापरणे ही एक सामान्य गोष्ट आहे. उन्हाळ्यात या एसीची तीव्र गरज असते. कारण उन्हामुळे प्रचंड उष्णता वाढते. तुम्ही उन्हात कार चालवत असाल तर एसी ही गरजेची असते. पण एखाद्यावेळी प्रचंड उकडत असतं, आपण एसी ऑन करतो. पण त्यातून खुप दुर्गंधी येते.
advertisement
2/8
कार एसीमधून दुर्गंधी येत असेल तर त्यात बसणंही कठीण होतं. प्रवासाची मजाच येत नाही. तुमच्याही कार एसीमधून खराब, दुर्गंधीयुक्त हवा येत असेल तर समजून घ्या की, त्याच्या आत बुरशी, फंगस आणि बॅक्टेरिया जमा झालेय.
advertisement
3/8
एसीच्या इवॅपोरेटर कोरमध्ये ओलावा अडकतो. इवॅपोरेटर कोर असा भाग असतो, जो हवा गार करुन गाडीच्या आत पाठवते. चला पाहूया की, एसीमधून दुर्गंधी येण्याची कारणं कोणती आणि ती समस्या कशी दूर करता येईल.
advertisement
4/8
AC मधून दुर्गंधी येण्याची कारणं : मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुम्ही एसी ऑन करता. तेव्हा गरम हवा ही गार इव्हॅपोरेटर कोरवर आदळते. ज्यातून पाण्याचे थेंब बनते. याला कंडेशनसेशन म्हणतात. हे पाणी सामान्यतः एका लहान ट्यूबने गाडीच्या खाली पडते. पण ही ट्यूब बंद झाली आणि पाणी नीट बाहेर पडू शकत नसेल तर तो ओलावा इव्हॅपोरेटरमध्येच राहतो.
advertisement
5/8
या ओलव्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी तयार होते. ज्यामुळे दुर्गंधी येते. अनेकदा केबिन एयर फिल्टर खराब झाल्यानेही ही समस्या वाढते. कारण ते हवेचा प्रवाह थांबवते. ज्यामुळे ओलावा जास्त जमा होतो. एसी ऑन करताच दुर्गंधी येत असेल तर समजून घ्या की, समस्या एसीच्या सिस्टमच्या आतच आहे.
advertisement
6/8
दुर्गंधी दूर कशी करावी? : सर्वात आधी केबिन एयर फिल्टर बदला. तुम्ही हे एक-दोन वर्षांपासून बदललं नाही तर ते खराब होऊन ओलावा आणि घाण जमा करते. अनेक कंपन्या 20-25 हजार किलोमीटर चालवल्यावर ते बदलण्याचा सल्ला देतात. हे बदलणे एलर्जी आणि श्वास घेण्यात अडचण असणाऱ्या प्रवाशांसाठी खुप गरजेचे आहे.
advertisement
7/8
इव्हॅपोरेटर कोर स्वच्छ करा : फिल्टर बदलल्यानंतरही दुर्गंधी येत असेल तर इव्हॅपोरेटर कोर स्वच्छ करायची गरज आहे. मॅकेनिक यासाठी एक खास फोन क्लीनरचा वापर करतात. जे बुरशी आणि बॅक्टेरिया नष्ट करतात. यासोबतच तुम्ही गाडी पार्क करण्याच्या काही मिनिटं आधी एसी बंद करा आणि फक्त फॅन चालू ठेवा. यामुळे इव्हॅपोरेटरमध्ये जमा झालेला ओलावा कोरडा होतो. ज्यामुळे बॅक्टेरिया निर्माण होत नाहीत.
advertisement
8/8
ओझोन ट्रीटमेंट : दुर्गंधी खूप जास्त येत असेल तर ओझोन ट्रिटमेंट करू शकता. यात एसी सिस्टमच्या आत ओझोन गॅस सोडला जातो. जो दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिलाया पूर्णपणे नष्ट करतो. हे फक्त दुर्गंधी लपवत नाही तर ती मुळापासून संपवते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Car AC मधून दुर्गंधी येतेय? डोंट वरी, काही ट्रिक्सने लगेच होईल दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल