Aryaman Birla : 20 व्या वर्षी डेब्यू, दोनच वर्षात क्रिकेट सोडलं, तरीही हा खेळाडू बनला कोहलीपेक्षा श्रीमंत
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आरसीबीच्या टीमची तब्बल 16,700 कोटी रूपयांना विक्री झाली आहे. आदित्य ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन या कंपन्यानी मिळून आरसीबीची टीम विकत घेतली आहे. विशेष म्हणजे आरसीबीच्या इतिहासातली ही सगळ्यात महागडी डील ठरली आहे.
advertisement
1/7

आयपीएल 2026 चा हंगाम येत्या 28 मार्चपासून सूरू होणार आहे. त्यामुळे या हंगामाला सूरूवात व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. असे असताना एका खेळाडूची प्रचंड चर्चा रंगली आहे. खरं तर हा खेळाडू आता खेळाडू राहिला नाही तर आयबीएसच्या फ्रेचायजीचा मालक बनला आहे.
advertisement
2/7
आरसीबीच्या टीमची तब्बल 16,700 कोटी रूपयांना विक्री झाली आहे. आदित्य ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन या कंपन्यानी मिळून आरसीबीची टीम विकत घेतली आहे. विशेष म्हणजे आरसीबीच्या इतिहासातली ही सगळ्यात महागडी डील ठरली आहे.
advertisement
3/7
या डीलनंतर आदित्य बिर्ला ग्रुपचे आर्यमन विक्रम बिर्ला हे आरसीबीचे नवीन चेअरमन असणार आहे.दरम्यान चेअरमन होण्यापूर्वी आर्यमन बिर्ला हे सर्वसामान्य खेळाडूं प्रमाणे क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावत होते.
advertisement
4/7
आर्यमन बिर्ला यांना क्रिकेटची आवड होती. त्यामुळे लहानपणापासून क्रिकेटचे धडे घेतल्यानंतर त्यांनी 2017-18 म्हणजेच वयाच्या 20 व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता.त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये मध्यप्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
advertisement
5/7
ओडीशाविरूद्ध त्याने पहिल्याच इनिंगमध्ये आर्यमन बिर्ला यांनी रजत पाटीदारसोबत 72 धावांची ओपनिंग पार्टनरशीप केली होती. आर्यमनने 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 414 रन केल्या.
advertisement
6/7
रणजी ट्रॉफी मधल्या कामगिरीनंतर 2018 साली राजस्थान रॉयल्सने आर्यमन बिर्ला यांनी टीममध्ये घेतलं होतं. या दरम्यान त्यांना आयपीएलमध्ये डेब्यूच करता आला नाही.पुढे मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे 2019 साली आर्यमन बिर्ला यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
advertisement
7/7
ज्यावेळेस आर्यमन यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा त्यांचे वय 22 होते. त्यानंतर आता तब्बल 6 वर्षानी म्हणजेच वयाच्या 28 व्या वयात ते आरसीबीचे चेअरमन बनले आहेत. त्यामुळे हा खेळाड़ू कोहलीपेक्षाही श्रीमंत निघाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Aryaman Birla : 20 व्या वर्षी डेब्यू, दोनच वर्षात क्रिकेट सोडलं, तरीही हा खेळाडू बनला कोहलीपेक्षा श्रीमंत