TRENDING:

रोज 5 तास मोमोज स्टॉलवर ड्युटी, 2 बहिणींनी कमावले पगारापेक्षा जास्त पैसे!

Last Updated:
दोघींनी मिळून पार्ट-टाइम मोमोज फूड कार्ट सुरू केले असून त्या वेज आणि नॉनव्हेज मोमोज विकतात. नोकरी आणि शिक्षण सांभाळत त्यांनी हा व्यवसाय उभारला आहे, त्यामुळे त्यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.
advertisement
1/7
रोज 5 तास मोमोज स्टॉलवर ड्युटी, 2 बहिणींनी कमावले पगारापेक्षा जास्त पैसे!
दिव्या आणि निकिता नेरुळकर या दोन बहिणींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर एक प्रेरणादायी व्यवसाय उभा केला आहे. दोघींनी मिळून पार्ट-टाइम मोमोज फूड कार्ट सुरू केले असून त्या वेज आणि नॉनव्हेज मोमोज विकतात. संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत त्यांचा स्टॉल सुरू असतो. नोकरी आणि शिक्षण सांभाळत त्यांनी हा व्यवसाय उभारला आहे, त्यामुळे त्यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.
advertisement
2/7
दिव्या एका खासगी कंपनीत नोकरी करते तर निकिता कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दिव्याला सुरुवातीपासूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती, मात्र नोकरीमुळे वेळ मिळत नव्हता.
advertisement
3/7
अशा वेळी तिच्या बहिणीने आणि आई-वडिलांनी तिला मोठा आधार दिला. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच हा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
4/7
दररोज संध्याकाळी दिव्या कामावरून येण्यापूर्वीच फूड कार्ट सुरू केले जाते. त्या वेळी निकिता आणि त्यांचे वडील ग्राहकांना सेवा देतात. दिव्या कामावरून परतल्यानंतर स्टॉलवर येते आणि कामात सहभागी होते.
advertisement
5/7
दिव्या सांगते की, दिवसभराच्या थकव्यानंतरही कार्टवर आल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते. निकिता देखील कॉलेजमधून परतल्यावर स्टॉलवर येते. ती म्हणते की, ताईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या दोघी एकत्र काम करत आहेत आणि भविष्यात हा व्यवसाय अधिक मोठा करण्याची त्यांची इच्छा आहे.
advertisement
6/7
या व्यवसायातून त्या दरमहा सुमारे 70 हजार रुपये कमावत आहेत. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. स्टॉलचा परिसर काहीसा असुरक्षित असल्याने रात्री उशिरापर्यंत काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही त्यांनी हार मानलेली नाही.
advertisement
7/7
आज त्या आत्मविश्वासाने सांगतात की, हा व्यवसाय पुढे नक्की वाढवणार. तरुणांना त्या संदेश देतात की, जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. सध्या त्यांचा मोमोज फूड कार्ट चाळ क्रमांक 1, अष्टविनायक को-ऑप. हाउसिंग सोसायटी, दिवा-आगासन रोड, दातीवली तलाव समोर, विकास म्हात्रे नगर दिवा, ठाणे संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
रोज 5 तास मोमोज स्टॉलवर ड्युटी, 2 बहिणींनी कमावले पगारापेक्षा जास्त पैसे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल