30,000 रुपये मिळालं मानधन, त्या गाण्यामुळे एका रात्रीत फेमस झाली अमृता खानविलकर; नशीबच बदलल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री अमृता खानविलकर एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबर उत्तम डान्सर देखील आहे. तिचं एक गाणं ज्यामुळे ती एका रात्रीत फेमस झाली. त्या गाण्यासाठी 30,000 रूपये मानधन मिळालं होतं.
advertisement
1/9

ओटीटी </a>विश्वातही तिची ओळख निर्माण केली आहे." width="1066" height="1600" /> अभिनेत्री अमृता खानविलकर ही सध्या मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीसह तिनं बॉलिवूड आणि ओटीटी विश्वातही तिची ओळख निर्माण केली आहे.
advertisement
2/9
अमृताचा प्रवास हा हिंदी रिअलिटी शोपासून सुरू झाला. हळूहळू ती मराठी इंडस्ट्रीत रमली. गोलमाल हा तिचा पहिला सिनेमा ठरला.
advertisement
3/9
मात्र अमृताला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी, आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अनेक वर्ष लागली.
advertisement
4/9
16 वर्षांआधी आलेल्या एका गाण्याने अमृता खानविलकरचं आयुष्य एका रात्रीत बदललं. अमृताला मराठी इंडस्ट्रीत नाव मिळालं. तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
advertisement
5/9
विश्वास बसणार नाही पण ज्या गाण्याने अमृताला ओळख मिळवून दिली त्या गाण्यासाठी तिला फक्त 30,000 रुपये मानधन मिळालं होतं.
advertisement
6/9
ज्या गाण्याविषयी आपण बोलत आहोत ते गाणं म्हणजे 'वाजले की बारा'. 2010 साली आलेल्या रवी जाधव दिग्दर्शित 'नटरंग' सिनेमातील ही लावणी आहे. सिनेमातील सगळ्यात सुपरहिट गाण्यांपैकी हे एक गाणं होतं. या गाण्यामुळे अमृता खानविलकर घराघरात पोहोचली.
advertisement
7/9
वाजले की बारा हे गाणं लागलं की अमृता खानविलकर डोळ्यांसमोर येत आणि अमृता खानविलकर म्हटल की वाजले की बारा हे समीकरण 16 वर्षांपासून असंच सुरू आहे.
advertisement
8/9
व्हरायटी इंडियाशी बोलताना अमृता म्हणाली, "हे गाणं दोन रात्रींमध्ये शूट केलं. मला रात्री दहा वाजता या गाण्यासाठी फोन आला. तू हे गाणं करशील का असं मला वाचारलं. मी त्यांना होकार दिला. त्या गाण्यासाठी मला तीन हजार रुपये मानधन मिळालं होतं."
advertisement
9/9
अमृता पुढे म्हणाली, "या गाण्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. ज्या ठिकाणी लाइटही नव्हती अशा ठिकाणी मी हे गाणं परफॉर्म केलं आहे. या गाणी इतकी क्रेझ होती की गावात लाईट नसायच्या पण लोकं माझा गाण्यावरचा डान्स बघायला यायचे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
30,000 रुपये मिळालं मानधन, त्या गाण्यामुळे एका रात्रीत फेमस झाली अमृता खानविलकर; नशीबच बदलल