TRENDING:

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीरवर बक्षिसांचा वर्षाव सूरुच,आता शरद पवारांनी पठ्ठ्याला दिलं मोठं गिफ्ट

Last Updated:

मुंबईत आज महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरसह अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Maharashtra Kesari Harshwardhan Sadgir met Sharad Pawar : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत जाऊन भेट घेतली आहे.या भेटीदरम्यान शरद पवार यांनी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला 12 लाख रूपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. तर अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे यासाठी 50 लाख रूपयांची मदत केली आहे.
Harshwardhan Sadgir met Sharad Pawar
Harshwardhan Sadgir met Sharad Pawar
advertisement

मुंबईत आज महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरसह अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान शरद पवार यांनी पुढील 2 वर्षासाठी 50 हजार प्रमाणे 12 लाखाचा चेक दिला आहे. त्यासोबत काकासाहेब पवार यांच्या पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला 50 लाख रूपयाची मदत केली आहे. या मदतीने काकासाहेब पवार यांना आता आणखी महाराष्ट्र केसरी घडवता येणार आहेत. या भेटी दरम्यान अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

advertisement

शरद पवार हे खेळाडूंसाठी तारणहार व आधार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांची आम्ही सर्व पैलवान व खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणा केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्यांचे आणि प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केल्याचे काकासाहेब पवार यांनी सांगितले.

शासकीय नोकरीही स्विकारणार

दरम्यान डबल महाराष्ट्र केसरी बनताच हर्षवर्धन सदगीरने अचानक कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण त्यानंतर दुसरे विजेतेपद आणि त्यामुळे झालेल्या आनंदाच्या भरात मी बोलून गेलो, माझा निवृत्तीचा विचार अजिबात नाही. माझ्याकडे अनुभव दांडगा असुन त्याचा उपयोग करून मला अजून खूप खेळायचे आहे,असे हर्षवर्धनने सांगत निवृत्तीच्या निर्णयातून यु टर्न घेतला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिकारीचे हत्यार तयार करणारे हात जेव्हा हार्मोनियम, तबला तयार करू लागले, मिरजकर म्युझिकल्सची कहाणी
सर्व पहा

तसेच पहिल्या विजेतेपदानंतरमला शासनाकडून सेवेत सामावून घेतले जाईल अशी अपेक्षा होती. अनेक प्रयत्न केले. पण ते फोल ठरले.मात्र आता सरकारची भूमिका बदलली आहे. यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत दाखल करून घेतले जाते. भविष्यात सरकारने शासकीय सेवेत रुजू होण्याचा प्रस्ताव ठेवल्यास नक्कीच स्विकारेने, असे देखील हर्षवर्धन म्हणाला आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीरवर बक्षिसांचा वर्षाव सूरुच,आता शरद पवारांनी पठ्ठ्याला दिलं मोठं गिफ्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल