अर्जुन तेंडुलकरचा भेदक स्पेल
सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकरच्या भेदक स्पेलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आयपीएल 2026 मध्ये अर्जुन तेंडुलकर लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळणार आहे. इंट्रा स्क्वॉड मॅचमध्ये अर्जुनच्या बॉलिंगचा सामना करत असताना लखनऊच्या बॅटरना संघर्ष करावा लागत होता, कारण अर्जुन एखाद्या आंतरराष्ट्रीय बॉलरसाखीच बॉलिंग करत होता.
अर्जुन तेंडुलकरची ही बॉलिंग पाहून लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतही खुश झाला असेल, तसंच अर्जुनचा हा स्पेल पाहून ऋषभ पंत अर्जुनला या आयपीएलमध्ये जास्त सामने खेळण्याची संधी देऊ शकतो, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
अर्जुन तेंडुलकर 2021 मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आला त्यानंतर 2025 पर्यंत अर्जुन मुंबईसोबतच होता, पण या 5 वर्षात त्याला खेळण्याची फार संधी मिळाली नाही. आतापर्यंत अर्जुन तेंडुलकरने फक्त 5 मॅच खेळल्या ज्यात त्याला 3 विकेट घेता आल्या आणि त्यांनी 13 रन केल्या आहेत. आता आयपीएलच्या या मोसमात अर्जुनला संधी मिळणार का नाही? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आर.अश्विन याच्या मते मात्र अर्जुनला या मोसमातही बेंचवरच बसावं लागू शकतं.
