TRENDING:

Shukra Gochar 2026: वाईटावर टपलेल्यांच्या मनासारखं..! पैसेवाला ग्रह या राशींची साथ सोडणार, बिकट काळ आला

Last Updated:
Shukra Gochar 2026: आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहीतच असेल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राला पैसेवाला ग्रह आपण म्हणू शकतो. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. त्याची कोणाच्याही राशीवर कृपा असेल तर पैशांसाठी वणवण करावी लागत नाही, लक्ष्मी आपल्याकडे येत राहते. असा हा शुक्र ग्रह 26 मार्च 2026 रोजी पहाटे 04:50 वाजता मेष राशीत प्रवेश करेल.
advertisement
1/6
वाईटावर टपलेल्यांच्या मनासारखं..! पैसेवाला ग्रह या राशींची साथ सोडणार, बिकट काळ आला
शुक्राचे गोचर मंगळाची राशी असलेल्या आणि साडेसातीचा पहिला टप्पा सोसत असलेल्या मेष राशीत होईल. मंगळाला धैर्य, उत्कटता आणि जलद निर्णयक्षमतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे जेव्हा कधी शुक्र मेष राशीत असतो, तेव्हा तो मंगळाच्या ऊर्जेवर परिणाम करून टाकतो. शुक्राच्या गोचरामुळे कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम होईल त्याविषयी जाणून घेऊ.
advertisement
2/6
मेष - शुक्र मेष राशीच्या लग्न स्थानात गोचर करेल. या काळात मेष राशीची माणसं पैसा मिळवतील पण पैसे वाचवू शकणार नाहीत. याचा अर्थ खर्च वाढेल, खर्चावर आवर घालता येणार नाही. घरातील नाहक कटकटी डोकेदुखी ठरू शकतात, वादांना तोंड द्यावे लागू शकते. कामावर वरिष्ठांसोबतचे संबंधही बिघडू शकतात. कामाचा ताण वाढू शकतो. अपेक्षित नफा मिळवण्यासाठी बरेच कष्ट सोसावे लागेल. काही कारणांनी सामाजिक प्रतिष्ठेवरही घाला पडू शकतोय.
advertisement
3/6
कर्क - शुक्र कर्क राशीच्या दहाव्या स्थानात गोचर करेल. तुमच्या वाईटावर टपलेली त्रास देऊ शकतात, कामाच्या ठिकाणी दबाव वाढू शकतो. नोकरी बदलण्याची शक्यता आहे, पण सावधगिरी बाळगा. जास्त कामाच्या भारामुळे मानसिक ताण येऊ शकतो. व्यावसायिकांना नफा मिळवणे अवघड जाऊ शकते. तुम्ही पैसे कमवाल, पण खर्च वाढेल. तुमच्या जोडीदारासोबतचा समन्वय कमी होऊ शकतो. उच्च रक्तदाबाची चिंता असू शकते.
advertisement
4/6
कन्या - शुक्र कन्या राशीच्या आठव्या घरात प्रवेश करेल. सगळं ठीक असताना उगाचच चिंता वाढू शकते, त्यानं निराशा येऊ शकते. व्यवसायातील निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते. अहंकारामुळे वाद वाढू शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची अत्यंत काळजी घ्यावी लागेल.
advertisement
5/6
मकर - शुक्र मकर राशीच्या चौथ्या घरातून भ्रमण करेल. बऱ्यापैकी सगळं सेट असतानाही तुम्हाला असुरक्षित वाटू शकते. कौटुंबिक त्रासांना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिस्पर्धकांकडून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे तुमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. 
advertisement
6/6
मीन - शुक्र मीन राशीच्या दुसऱ्या घरातून भ्रमण करेल. या काळात, प्रगतीच्या मार्गात अनेक विघ्न निर्माण होऊ शकतात. कामात आत्मविश्वास कमी झाल्याचे जाणवेल. अपेक्षित लाभ न मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर शहाणपणाने निर्णय घ्या. तुम्हाला व्यवसायात नुकसान होऊ शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shukra Gochar 2026: वाईटावर टपलेल्यांच्या मनासारखं..! पैसेवाला ग्रह या राशींची साथ सोडणार, बिकट काळ आला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल