Property Rules : हाऊसिंग सोसायटीच्या कमिटीचे सभासदत्व कधी रद्द होते? नियम काय सांगतो?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Housing Society Rules : हाऊसिंग सोसायटी कमिटी सदस्यत्व आणि सभासदत्व कधी संपते? याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो.
advertisement
1/5

<strong>मुंबई :</strong> हाऊसिंग सोसायटी कमिटी सदस्यत्व आणि सभासदत्व कधी संपते? याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो.मात्र सहकार कायद्यांनुसार काही विशिष्ट परिस्थितीत सभासदत्व आपोआप संपुष्टात येते आणि त्याचा थेट परिणाम कमिटी सदस्यत्वावरही होतो.
advertisement
2/5
<strong>कोणत्या परिस्थितीत सभासदत्व रद्द होते?</strong> गृहनिर्माण संस्थेत अनेक परिस्थितीत सभासदत्व समाप्त होते. जसे की, सभासदाने दिलेला राजीनामा संस्थेने अधिकृतपणे मंजूर केल्यास, संबंधित सभासदाचा भागदाखला (शेअर) दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित झाल्यास, सभासदाचा मृत्यू झाल्यास तसेच संस्थेच्या सर्वसाधारण सभेने सभासदत्व रद्द केल्यावर आणि त्या ठरावाला संबंधित उप/सहाय्यक निबंधकांनी कलम ३५ अंतर्गत मंजुरी दिल्यास ट्रस्ट, कंपनी किंवा फर्म स्वरूपातील सभासद संस्था विसर्जित झाल्यास किंवा त्यांची नोंदणी रद्द झाल्यास सभासदत्व रद्द होईल.
advertisement
3/5
नोंदवहीत बदल अनिवार्य सभासदत्व संपल्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव सोसायटीच्या सभासद नोंदवहीतून काढणे बंधनकारक आहे. जर सोसायटीने ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर सहकार कायद्याच्या कलम २५ (अ) नुसार उप किंवा सहाय्यक निबंधक संस्थेला आवश्यक ते निर्देश देऊ शकतात.
advertisement
4/5
सहसभासद आणि सहयोगी सभासदांवरही परिणाम मुख्य सभासदाचे सभासदत्व संपुष्टात आल्यानंतर सहसभासद किंवा सहयोगी सभासदांचे सदस्यत्व देखील आपोआप रद्द होते. तसेच, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यास किंवा त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे सदस्यत्व संपते.
advertisement
5/5
कमिटी सदस्यत्वावर थेट परिणाम गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर निवडून आलेल्या सदस्यासाठी सभासद असणे आवश्यक असते. त्यामुळे सभासदत्व संपल्यास त्या व्यक्तीचे कमिटी सदस्यत्वही आपोआप रद्द होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Property Rules : हाऊसिंग सोसायटीच्या कमिटीचे सभासदत्व कधी रद्द होते? नियम काय सांगतो?