Dhurandhar 2 चा अभिनेताच पाहू शकत नाहीये स्वत:ची फिल्म; तिकिटीसाठी नाहीत पैसे
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 2 The revenge : धुरंधर 2 मध्ये एक छोटीशी भूमिका करणारा हा अभिनेता ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्याने पैशांअभावी ही फिल्म पाहता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
advertisement
1/7

रणवीर सिंगची फिल्म धुरंधर 2 म्हणजे 'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिसवर चांगलीत कामगिरी करत आहे. कित्येकांनी ही फिल्म पाहिली आहे आणि कित्येक जण अजून फिल्म पाहण्याच्या तयारीत आहे. दरम्यान या फिल्मच्या अभिनेत्याने स्वत:ची फिल्म पाहिली नाही आहे. याचं कारण म्हणजे त्याच्याकडे फिल्मची तिकीट खरेदी करता येईल इतकेही पैसे नाहीत.
advertisement
2/7
अलीकडेच या अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये त्याने आपलं सत्य आणि असहाय्यता उघडपणे मांडली आहे. त्याने सांगितलं की, त्याला अद्याप स्वतःचा चित्रपट पाहता आला नाही अभिनेत्याची मुलं, संपूर्ण कुटुंब त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण हा अभिनेता त्यांना फिल्म पाहायला घेऊन जाऊ शकत नाही. याचं कारण म्हणजे धुरंधर 2 चं तिकिट.
advertisement
3/7
अभिनेत्याने सांगितलं, आपल्या वडिलांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी माझी मुलं खूप उत्सुक होती. त्यांचे वडील या चित्रपटाचा भाग आहेत हे कळताच त्यांनी तो पाहण्याचा लगेच आग्रह धरला. मात्र आर्थिक अडचणींमुळे ते त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकले नाहीत.
advertisement
4/7
पुढे स्पष्टीकरण देताना तो सांगतो की, सध्या फिल्मची तिकिटं खूप महाग आहेत. एका तिकिटाची किंमत सुमारे 500 रुपये आहे आणि त्याच्या कुटुंबात पाच सदस्य आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी अंदाजे 2500 रुपये खर्च येईल, जो सध्या त्याला परवडत नाही. त्याचं कुटुंब महिन्याला जेमतेम अडीच हजार रुपये वाचवू शकतं. त्यामुळे एकाच वेळी एवढे पैसे खर्च करणं अवघड आहे.
advertisement
5/7
काही काळानंतर जेव्हा तिकिटांचे दर कमी होतील, तेव्हा तो आपल्या कुटुंबासोबत नक्कीच चित्रपट पाहायला जाईल, अशी आशा त्याने व्यक्त केली.
advertisement
6/7
जिथं रणवीर सिंगच्या दमदार कामगिरीची चर्चा होते आहे. तिथं या अभिनेत्याच्या छोट्याशा भूमिकेने लक्ष वेधून घेतलं आहे. शेवटच्या सीनमध्ये दिसलेला हा अभिनेता.
advertisement
7/7
फिल्मच्या शेवटी रणवीर एका ऑटोमधून आपल्या घरी जातो. यात ऑटो ड्रायव्हरची भूमिका करणारा हा अभिनेता जो खऱ्या आयुष्यातही एक ऑटो चालक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 चा अभिनेताच पाहू शकत नाहीये स्वत:ची फिल्म; तिकिटीसाठी नाहीत पैसे