TRENDING:

Protien Rich Dal : सर्वात जास्त प्रोटीन कोणत्या डाळीत असतं? रोज एक वाटी डाळ खाल्ल्यानं काय फायदे होतात?

Last Updated:
Dal Benefits : आपल्या आहारात सर्व पोषक तत्त्वांचा समावेश असणं आवश्यक आहे. म्हणूनच आपण डाळीदेखील नियमित खाल्ल्या पाहिजेत. पण बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की, कोणत्या डाळीतून आपल्याला जास्त प्रोटीन मिळू शकतं..
advertisement
1/7
सर्वात जास्त प्रोटीन कोणत्या डाळीत असतं? रोज एक वाटी डाळ खाल्ल्यानं काय फायदे होतात?
प्रोटीन आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचं पोषक तत्व आहे. मांसाहारी लोक चिकन, मटण किंवा अंडी खाऊन रोजच्या प्रोटीनची गरज भागवतात. शाकाहारींसाठी प्रोटीनचा चांगला सोर्स पनीर, टोफू आणि डाळी आहेत. त्यातही कोणत्या डाळीतून आपल्याला जास्त प्रोटीन मिळू शकतं हे बऱ्याच आपल्याला माहित नसतं.
advertisement
2/7
सर्व डाळींमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यातून आपल्याला प्लांट प्रोटीन, फायबर आणि मिनरल्स मिळतात. संपूर्ण आठवड्यात आपण आपल्या आहारामध्ये एका तर डाळीचा समावेश करावा, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र कोणती डाळ जास्त प्रोटीन देते आणि प्रत्येक डाळीचे आपल्याला कसे फायदे होऊ शकतात? चला पाहूया.
advertisement
3/7
स्वयंपाकासाठी कमी वेळ असेल पण पोट भरेल असं जेव्हा करायचं असेल तर तेव्हा मसूर डाळ खाणं योग्य. या डाळीची तुम्ही वेगवेगळे मसाले टाकून वेगवेगळ्या पद्धतीनं डिश बनवू शकता. फक्त भातासोबतही ही डाळ उत्तम लागते. मासूरची डाळ लवकर शिजते आणि भरपूर पोषण देते. यामध्ये प्लांट प्रोटीन भरपूर असतं आणि ती ऊर्जेची टिकवण्यास मदत करते. रात्रीच्या जेवणात मसूर डाळ खाणं उत्तम. कारण ती पोटाला जड होत नाही आणि पोषण भरपूर देते.
advertisement
4/7

5/7
तुरीची डाळ आपल्याकडे जास्त प्रमाणात खाल्ली जाते. रोजच्या आहारात बऱ्याच लोकांकडे तुरीच्या डाळीचं वरण आणि भात बनवला जातो. ही डाळ प्रथिने आणि पोटॅशियमने समृद्ध असते. तुम्ही या डाळीचा सांबार, डाळ तडका किंवा साधी डाळही बनवू शकता. प्रत्येक प्रकारात ही डाळ चविष्ट लागते.
advertisement
6/7
शेवटी असते मुगडाळ. ही डाळ पचायला हलकी असते. ज्या दिवशी शरीराला थोड्या विश्रांतीची गरज असते, तुम्हाला साधं साधं अन्न खायचं असतं तेव्हा ही डाळ उत्तम पर्याय आहे. मूगडाळीमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतं. मूग डाळ कोणत्याही त्रासाशिवाय प्रोटीन आणि आयर्नचा पुरवठा करते.
advertisement
7/7
मुगडाळ प्रोटीनचा सर्वात चांगला सोर्स आहे. पिवळ्या मूगडाळीमध्ये मूग सर्वात जास्त प्रोटीन असतात. म्हणजे 100 ग्रॅम पिवळ्या मूगडाळीमध्ये जवळपास 24 ग्रॅम प्रथिने असतात. प्रोटीनसोबतच त्यात फायबर, लोह आणि पोटॅशियम यांसारखी इतर अनेक पोषक तत्वेही असतात. मूगडाळीला शुद्ध तुपाची फोडणी देऊन तयार केल्यास ती आणखी जास्त फायदे देते. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Protien Rich Dal : सर्वात जास्त प्रोटीन कोणत्या डाळीत असतं? रोज एक वाटी डाळ खाल्ल्यानं काय फायदे होतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल