TRENDING:

Zubeen Garg: बॉडीमध्ये अल्कोहोल, यॉचवर बेफिकीरपणा.. झुबीन गर्गच्या मृत्यूवर सिंगापूर कोर्टाचा मोठा निर्णय

Last Updated:
Zubeen Garg Death: १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरच्या लाझारस आयलंडवर झुबीन यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण भारत हळहळत होता.
advertisement
1/9
झुबीन गर्गच्या मृत्यूवर सिंगापूर कोर्टाचा मोठा निर्णय, निधनाच्या 6 महिन्यांनी शॉकिंग निकाल
सहा महिन्यांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली होती. आसामचे प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण भारत हळहळत होता. १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरच्या लाझारस आयलंडवर झुबीन यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता.
advertisement
2/9
झुबीन एका कार्यक्रमासाठी त्यांच्या संपूर्ण टीमसह सिंगापूरला गेले होते. अशातच एका बेटावर मित्रांसह मजामस्ती करायला गेले असताना त्यांच्यासोबत दुर्दैवी अपघात झाला आणि पाण्यात पोहायला उतरलेल्या झुबीन यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अशातच सिंगापूरच्या कोर्टाने या प्रकरणावर आपला अंतिम निर्णय दिला आहे.
advertisement
3/9
झुबीन यांच्या मृत्यूनंतर देशात दुःखाची लाट आली होती. आसाम सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर शासकीय दुखवटाही पाळला होता. प्रकरणी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने त्यांच्या मॅनेजरसह ७ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशातच सिंगापूरच्या कोर्टाने झुबीन गर्ग यांचा मृत्यू हा कोणताही घातपात नसून तो एक दुर्दैवी अपघात असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
advertisement
4/9
सिंगापूरचे कोरोनर अ‍ॅडम नाखोडा यांनी दिलेल्या निकालानुसार, १९ सप्टेंबरच्या त्या दुपारी झुबीन गर्ग सुमारे २० जणांच्या ग्रुपसोबत एका यॉटवर फिरण्यासाठी गेले होते. 'नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल'मध्ये परफॉर्म करण्याच्या आदल्या दिवशी ही ट्रिप आयोजित करण्यात आली होती.
advertisement
5/9
कोर्टात सादर झालेल्या पुराव्यांनुसार, झुबीन यांनी त्या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यपान केले होते. त्यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण हे कायदेशीर मर्यादेपेक्षा चार पटीने जास्त होते. तसेच यॉटच्या कॅप्टनने आणि सहकाऱ्यांनी वारंवार सांगूनही झुबीन यांनी लाईफ जॅकेट घालण्यास ठाम नकार दिला.
advertisement
6/9
पहिल्यांदा पोहायला गेल्यावर त्यांनी जॅकेट काढले आणि दुसऱ्यांदा जॅकेटशिवायच समुद्रात उडी मारली. ज्यावेळी झुबीन दुसऱ्यांदा समुद्रात पोहत होते, तेव्हा ते लाझारस आयलंडच्या दिशेने जात होते. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना प्रचंड थकवा जाणवला असावा, कारण त्यांनी अचानक यॉटच्या दिशेने परत पोहायला सुरुवात केली.
advertisement
7/9
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये झुबीन पाण्यात तरंगत असल्याचं दिसत होतं. यॉटवर परतत असतानाच अचानक ते पाण्यात शांत झाले आणि त्यांचे तोंड पाण्यात बुडाले. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना बाहेर काढून सीपीआर दिला, पण हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
advertisement
8/9
तथापि, झुबीन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आणि चाहत्यांनी हा अपघात नसून यामध्ये घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. त्यावर कोर्टाने स्पष्ट केलं की, झुबीन यांना कोणीही पाण्यात ढकलले नाही किंवा कोणीही त्यांच्यावर जबरदस्ती केली नाही. त्यामुळे घातपातासंबंधी कोणतेही पुरावे सापडले नाहीत.
advertisement
9/9
दरम्यान, भारतात झुबीन यांच्या मृत्यूचा शोध घेण्यासाठी आसामध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची स्थापना करण्यात आली होती, त्यानुसार ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुवाहाटी उच्च न्यायालयाने या खटल्यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' स्थापन केले असून, एका वर्षात याचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Zubeen Garg: बॉडीमध्ये अल्कोहोल, यॉचवर बेफिकीरपणा.. झुबीन गर्गच्या मृत्यूवर सिंगापूर कोर्टाचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल