TRENDING:

नवले पुलावरील मृत्यूचे सत्र थांबणार! काय आहे सरकारचा 6 हजार कोटींचा 'मास्टर प्लॅन'?

Last Updated:
नवले पुलाजवळील राष्ट्रीय महामार्गाचा ५ ते ६ किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. भौगोलिक रचना आणि जड वाहनांची वर्दळ यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
advertisement
1/7
नवले पुलावरील मृत्यूचे सत्र थांबणार! काय आहे सरकारचा 6 हजार कोटींचा 'मास्टर प्लॅन'?
पुण्यातील नवले पुलावर सतत होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्चाचा भव्य 'उन्नत मार्ग' उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
advertisement
2/7
राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत ही महत्त्वाची माहिती दिली. आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत नवले पुलावरील वाढत्या अपघातांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
advertisement
3/7
त्याला उत्तर देताना योगेश कदम यांनी सांगितले की, नवले पुलाजवळील राष्ट्रीय महामार्गाचा ५ ते ६ किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. भौगोलिक रचना आणि जड वाहनांची वर्दळ यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
advertisement
4/7
२०२२ मध्ये येथे १२ अपघात झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या १६ पर्यंत पोहोचली. विशेषतः २०२५ मध्ये एकाच भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे, जी अत्यंत चिंताजनक बाब आहे.
advertisement
5/7
रस्त्यावर येणारा ताण आणि तांत्रिक दोष दूर करण्यासाठी 'उन्नत मार्ग' हाच अंतिम पर्याय असल्याचे सरकारने मान्य केले आहे. या ६ हजार कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत आहे.
advertisement
6/7
या चर्चेत आमदार शंकर जगताप यांनीही सहभाग घेऊन काही महत्त्वाच्या तांत्रिक सूचना मांडल्या.
advertisement
7/7
नवले पुलावरील हा प्रस्तावित उन्नत मार्ग झाल्यास, स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील जड वाहतूक वेगळी होईल, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
नवले पुलावरील मृत्यूचे सत्र थांबणार! काय आहे सरकारचा 6 हजार कोटींचा 'मास्टर प्लॅन'?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल