स्पीकर पाहण्याच्या बहाण्याने बोलावलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (२१ मार्च) रात्री सव्वा नऊच्या सुमारास हा थरार घडला. संशयित आरोपी सुफियान अन्सारी याने पीडित मुलाला "स्पीकर पाहायचे आहेत" असे सांगून पवार वस्ती येथे बोलावले होते. आपल्या चुलत भावांसोबत तिथे पोहोचलेल्या पीडित मुलाला संशयितांनी घेरले. काही समजण्याच्या आतच, जुन्या वादाचे निमित्त काढून आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला.
advertisement
डोक्यावर आणि कपाळावर वार
आरोपींनी पीडित मुलाच्या कपाळावर लोखंडी कड्याने जोरदार प्रहार केला, तर डोक्याच्या मागील बाजूस कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर आरोपींनी तिथून पळ काढला. जखमी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून शिफ्टेन खान, आझाम खान, सुफियान नौशाद अन्सारी आणि उमर (सर्व राहणार दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोडी पोलीस सध्या या फरार आरोपींचा शोध घेत असून, अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली हिंसेची प्रवृत्ती पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
