TRENDING:

IPL 2026 : सरकारी नोकरीचं लेटर घेऊन पोहोचले योगी आदित्यनाथ, पण रिंकू आलाच नाही, भर कार्यक्रमात CM म्हणाले...

Last Updated:

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारी नोकरीच्या नियुक्तीचं पत्र घेऊन पोहोचले, पण क्रिकेटपटू रिंकू सिंगने या कार्यक्रमाला दांडी मारली. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी भर कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचं नाव मोठं करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खेळाडूंना नियुक्तीचं पत्र दिलं. लखनऊच्या लोकभवनमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते क्रिकेटपटू रिंकू सिंग याला सरकारी नोकरीच्या नियुक्तीचं पत्र मिळणार होतं, पण या कार्यक्रमाला रिंकू सिंग पोहोचलाच नाही. काही अपरिहार्य कारणांमुळे रिंकू कार्यक्रमाला उपस्थि राहू शकला नसल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारी नोकरीचं लेटर घेऊन पोहोचले योगी आदित्यनाथ, पण रिंकू आलाच नाही, भर कार्यक्रमात CM म्हणाले...
सरकारी नोकरीचं लेटर घेऊन पोहोचले योगी आदित्यनाथ, पण रिंकू आलाच नाही, भर कार्यक्रमात CM म्हणाले...
advertisement

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

रिंकू सिंग याला क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्तीचं पत्र मिळणार होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: रिंकू सिंग नियुक्ती पत्र घ्यायला का आला नाही? याचं कारण सांगितलं. रिंकू सिंग हा कॅम्पमध्ये बिझी आहे, त्यामुळे तो नियुक्ती पत्र घ्यायला येऊ शकला नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. आयपीएल 2026 मध्ये रिंकू केकेआरकडून खेळणार आहे, यासाठी तो केकेआरच्या टीममध्येही पोहोचला आहे. एवढंच नाही तर त्याची केकेआरचा उपकर्णधार म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.

advertisement

रिंकू सिंग काय काम करणार?

रिंकू सिंग याची रिजनल स्पोर्ट्स ऑफिसर (आरएसओ) म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. यात रिंकूचं मुख्य काम क्रीडा उपक्रमांचे व्यवस्थापन करणं असणार आहे. विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणे, खेळाडूंच्या प्रशिक्षणाचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे. स्टेडियम, वसतीगृह व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प यांच्यासारख्या प्रशासकीय कामांवर देखरेख ठेवणे, तसंच कर्मचाऱ्यांना अहवाल देणे आणि खेळासंबंधीत सरकारी धोरणांची अंमलबजावणी करणे, ही कामं रिंकू सिंगला करावी लागणार आहेत.

advertisement

रिंकूला किती पगार मिळणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
छंद असावा तर असा, तब्बल 10 हजार दुर्मिळ टपाल तिकिटाचा केला संग्रह, काय आहे खास? Video
सर्व पहा

आरएसओ हे पद उत्तर प्रदेश सरकारमधील ग्रुप बी पद आहे. या पदासाठी 50 हजार ते 1 लाख रुपये पगार मिळतो. तसंच घरभाडे भत्ता (HRA), वैद्यकीय सुविधा, सरकारी वाहन आणि प्रवास भत्ता यासारखे फायदे मिळतात.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : सरकारी नोकरीचं लेटर घेऊन पोहोचले योगी आदित्यनाथ, पण रिंकू आलाच नाही, भर कार्यक्रमात CM म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल