TRENDING:

छंद असावा तर असा, तब्बल 10 हजार दुर्मिळ टपाल तिकिटाचा केला संग्रह, काय आहे खास? Video

Last Updated:

टपाल तिकीट गोळा करण्याचा छंद आहे. त्यांनी आतापर्यंत दहा हजार पेक्षा जास्त टपाल तिकिटे गोळा केलेली आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आवड असते. प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो. कोणाला चित्र काढायचा, कुणाला गाणं गायचा किंवा कोणाला वेगवेगळ्या गोष्टी गोळा करायचा. असा छंद छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारे दीपक मोदी यांना देखील आहे. त्यांना टपाल तिकीट गोळा करण्याचा छंद आहे. त्यांनी आतापर्यंत दहा हजार पेक्षा जास्त टपाल तिकिटे गोळा केलेली आहेत.
advertisement

छत्रपती संभाजीनगरचे दीपक मोदी आहेत. ते व्यावसायिक आहेत. त्यांना लहानपणापासूनच टपाल तिकीट गोळा करायची आवड होती. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळी दहा हजार पेक्षा जास्त टपाल तिकिटे गोळा केलेली आहेत. यामध्ये भारतातील तिकिटे आहेत, पण त्यासोबत परदेशातील देखील काही दुर्मिळ अशी तिकिटे त्यांच्याकडे आहेत. त्यासोबतच या टपाल तिकिटांसाठी त्यांना अनेक स्पर्धांमध्ये गोल्ड, सिल्वर असे मेडल देखील मिळालेली आहेत. अतिशय दुर्मिळ असे आणि अतिशय महागडे असे तिकिट देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

advertisement

नोकरी सोडली अन् ‘तो’ मालक बनला, 5 वर्षांत मच्छीचा फेमस ब्रँड, यशाचं रहस्य काय? Video

त्यासोबतच पोस्टाची विशेष तिकिटे निघतात, त्यासाठी देखील त्यांनी वेगळी नोंदणी केलेली आहे. म्हणजे जे पण कुठले नवीन किंवा दुर्मिळ तिकीट मिळेल, ते लगेच दीपक मोदी यांना देखील मिळते आणि भविष्यात देखील त्यांना हा संग्रह अजून खूप वाढवायचा आहे, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
छंद असावा तर असा, तब्बल 10 हजार दुर्मिळ टपाल तिकिटाचा केला संग्रह, काय आहे खास? Video
सर्व पहा

त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या ओळखीतले मित्र, इतर नातेवाईक त्यांच्याकडे जर कुठले दुर्मिळ तिकीट आले किंवा कुठलेही वेगळे असे तिकीट आले, तर ते स्वतःहून त्यांना आणून देतात. आणि यामध्ये माझ्या कुटुंबाने खूप मला साथ दिलेली आहे, असे देखील दीपक यांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छंद असावा तर असा, तब्बल 10 हजार दुर्मिळ टपाल तिकिटाचा केला संग्रह, काय आहे खास? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल