नोकरी सोडली अन् ‘तो’ मालक बनला, 5 वर्षांत मच्छीचा फेमस ब्रँड, यशाचं रहस्य काय? Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Business Success: प्रफुल यांच्यासोबत पाच जण काम करत असून त्यांनी इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
मुंबई: सध्या काही तरुण जिद्द, मेहनत आणि नवीन आयडिया घेऊन उद्योग-व्यवसायात चांगलं यश मिळवत आहेत. चेंबूरमधील तरुण उद्योजक प्रफुल गंगावणे यांनी पदवीच्या पहिल्या वर्षापर्यंतच शिक्षण घेतलं. त्यानंतर नोकरी स्वीकारली. मात्र, स्वत:चा उद्योग उभारण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यातूनच ‘द फिशी मार्ट’ या व्यवसाय उभा राहिला.
प्रफुल गंगावणे हे पूर्वी खाजगी कंपनीत नोकरी करत होते. नोकरी करत असताना त्यांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. त्या ध्यासातून त्यांनी आधी चहाचा आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करून पाहिला. या अनुभवातून शिकत त्यांनी अखेर मच्छी विक्रीच्या क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतला आणि 2021 मध्ये ‘फिशी मार्ट’ची सुरुवात केली.
advertisement
प्रफुल यांचा मुख्य उद्देश ग्राहकांना ताजी, स्वच्छ आणि व्यवस्थित पॅक केलेली मच्छी घरपोच उपलब्ध करून देणे हा होता. विशेषतः महिलांचा विचार करून त्यांनी मच्छी साफ करून देण्याची सुविधा सुरू केली, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात. सुरुवातीच्या काळात विशेषतः कोरोना महामारीदरम्यान त्यांनी हा व्यवसाय घरातूनच सुरू ठेवला आणि स्वतःच डिलिव्हरी करायचे.
advertisement
हळूहळू ग्राहकांचा विश्वास वाढत गेला आणि प्रतिसादही उत्तम मिळू लागला. सुरुवातीला रविवारी फक्त एकच ऑर्डर मिळत होती. मात्र आज परिस्थिती बदलली असून दररोज 50 ते 60 ऑर्डर्स मिळतात. वाढत्या मागणीमुळे प्रफुल यांनी चेंबूर स्टेशनबाहेर स्वतःचे दुकानही सुरू केले आहे. त्यांच्या दुकानातील मच्छीचा साठा अवघ्या दोन तासांत संपतो.
आज प्रफुल यांच्या सोबत पाच जण काम करत असून त्यांनी इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. याबद्दल त्यांना विशेष समाधान वाटते. ग्राहकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि वाढती मागणी यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे, असे प्रफुल सांगतात.
advertisement
दरम्यान, प्रफुल यांचा संदेश स्पष्ट आहे. मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. छोट्या व्यवसायातून सुरुवात करा. अपयश आले तरी खचू नका. कारण दहा प्रयत्नांपैकी किमान एक तरी यशस्वी होतोच. त्यांच्या या प्रवासातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 2:14 PM IST
मराठी बातम्या/मनी/
नोकरी सोडली अन् ‘तो’ मालक बनला, 5 वर्षांत मच्छीचा फेमस ब्रँड, यशाचं रहस्य काय? Video








