advertisement

पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली, सुनेत्रा पवारांनी उधळला पटेल-तटकरेंचा डाव? 'त्या' पत्राने खळबळ

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात अत्यंत खळबळजनक आरोप केले आहे.

News18
News18
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात अत्यंत खळबळजनक आरोप केले आहे. दोन्ही नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत निवडणूक आयोगाला पत्रही लिहिलं होतं, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. शिवाय त्यांनी पीयूष गोयल यांच्या विधानाचा उल्लेख करत पटेल-तटकरेंवर निशाणा साधला आहे.

पत्रात नक्की काय म्हटलं होतं?

रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, , अजित पवारांच्या निधनानंतर (२८ जानेवारी २०२६) अवघ्या १८ व्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल पटेल , सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं. या पत्रावर या तिघांच्या सह्या आहेत. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचं खोटं सांगितलं आणि पक्षाचे सर्व अधिकार 'कार्याध्यक्षांना' (प्रफुल पटेल) देण्याची मागणी केली.
advertisement
हे पत्र लिहित असताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेतलं नव्हतं. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या, तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागली असावी. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २८ जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरेंचा डाव उधळून लावला का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

काही दिवसापूर्वी अजितदादा पक्षाची काही कागदपत्रे समोर आली. हा कागद १० मार्चचा आहे, यामध्ये सुनेत्राकाकी यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात २८ जानेवारी २०२५ ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यत जो पत्र व्यवहार निवडणूक आयोगाला केला जाईल तो ग्राह्य धरू नये. २६ फेब्रुवारीला एक पत्र अजितदादा पक्षाचे निवडणूक आयोगाला देण्यात आले होते, त्यात सह्या प्रफुल पटेल तटकरे यांच्या आहेत, ज्यामध्ये लिहिलं होत कि, आमचा पक्षाचा कॉस्टिट्युशन बदलला आहे.
advertisement
जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नेशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे (कार्यकारी अध्यक्ष Working President) ताकद असेल असा या पत्रात म्हटलं गेलं होतं, सर्व निर्णय हे ते घेतील असा या पत्रात म्हटलंय. कोण होतं नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल पटेल होते. यामध्ये सर्व अधिकार वर्किंग प्रेसिंडेन्ट यांच्याकडे असावे, असा या पत्रात होतं. पण हे पत्र जेव्हा सुनेत्रा काकींना कळल्यावर सुनेत्रा काकींनी आयोगाला पत्र दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष होपर्यत कोणताही पत्र विचारात घेऊ नये, असंही रोहित पवारांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली, सुनेत्रा पवारांनी उधळला पटेल-तटकरेंचा डाव? 'त्या' पत्राने खळबळ
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement