advertisement

Badlapur : नराधमाचा कळस! शूज काढण्याच्या बहाण्याने दोन चिमुकलींना घरात बोलावले अन्...; 40 वर्षीय व्यक्तीला अटक

Last Updated:

Badlapur News : सोसायटीली एका व्यक्तीला मदत करण्यासाठी गेलेल्या चिमुकलींवर एक भयावह प्रकार ओढावला आहे. जिथं या प्रकाराने संपूर्ण बदलापूर पुन्हा एकदा हादरुन गेलं आहे.

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींसोबत धक्कादायक घटना घडली.
बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींसोबत धक्कादायक घटना घडली.
बदलापूर : बदलापूर शहरातून पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आलेला आहे. कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका सोसायटीत हा प्रकार घडला. तिथं राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली खेळण्यासाठी सोसायटीच्या आवारात आलेल्या होत्या.
घडलं काय?
दरम्यान त्याच वेळी या इमारतीच्या तळमजल्यावर राहत असलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीने मुलींना फसवण्याचा प्रयत्न केला. ज्यात घरातील रॅकमधून शूज काढण्यासाठी मदत पाहिजे असल्याचे सांगून आपल्या घरी बोलावले. या मुली घरात गेल्यानंतर त्या व्यक्तीने त्यांच्यासमोर अश्लील हातवारे गेले. या प्रकारामुळे मुली खुप घाबरल्या आणि त्यांनी लगेच जाणून पालकांना सर्व प्रकार सांगितला.
advertisement
पालकांनी हा प्रकार ऐकताच लगेच कुळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोद्धात गुन्हाही नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सोसायटीत जाऊन आरोपीला अटक केली. बदलापूरात पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Badlapur : नराधमाचा कळस! शूज काढण्याच्या बहाण्याने दोन चिमुकलींना घरात बोलावले अन्...; 40 वर्षीय व्यक्तीला अटक
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement