advertisement

अजितदादांच्या विमान अपघातावर कर्नाटक पोलिसांचा झिरो FIR, महायुतीच्या मंत्र्याची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Ajit Pawar Death FIR: कर्नाटक पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल केल्यानंतर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची बाजू स्पष्ट करत पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादांच्या विमान अपघातावर कर्नाटक पोलिसांचा झिरो FIR, महायुतीच्या मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
अजितदादांच्या विमान अपघातावर कर्नाटक पोलिसांचा झिरो FIR, महायुतीच्या मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच, आता या प्रकरणाला कायदेशीर वेग आला आहे. कर्नाटक पोलिसांनी या घटनेप्रकरणी 'झिरो एफआयआर' (Zero FIR) दाखल केला आहे. कर्नाटक पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल केल्यानंतर
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची बाजू स्पष्ट करत पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासात कोणतीही दिरंगाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. रोहित पवार यांनी या प्रकरणी काही तांत्रिक पुरावे, बाबी समोर आणत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या एफआयआरची मागणी फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर रोहित पवार यांनी देशातील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत अजित पवारांच्या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित करण्याची विनंती, आवाहन केले होते. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल केला.
advertisement
अपघाताच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना योगेश कदम यांनी माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचा दाखला दिला. कदम म्हणाले, "कोणत्याही मोठ्या अपघातात सुरुवातीला 'एडीआर' (Accidental Death Report) म्हणजेच अकस्मात मृत्यूची नोंद केली जाते. विनायक मेटे यांच्या बाबतीतही आधी एडीआर झाला होता आणि सखोल चौकशीनंतर ५ महिन्यांनी गुन्हा दाखल झाला होता. मी या दोन्ही प्रकरणांची तुलना करत नाही, पण कायदेशीर प्रक्रिया तीच असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement

FIR टाळतोय हा समज चुकीचा

पोलीस प्रशासन किंवा सरकार एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या चर्चांना योगेश कदम यांनी पूर्णविराम दिला. "सरकारला किंवा पोलिसांना एफआयआर करायचाच नाहीये, असा जो मेसेज समाजात जातोय तो अतिशय चुकीचा आहे. आधी अपघाती मृत्यूची नोंद होते, त्यानंतर तांत्रिक बाबींची चौकशी केली जाते आणि मगच एफआयआरची प्रक्रिया पूर्ण होते. यात कुठेही दिरंगाई झालेली नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या विमान अपघातावर कर्नाटक पोलिसांचा झिरो FIR, महायुतीच्या मंत्र्याची पहिली प्रतिक्रिया
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement