advertisement

Nashik: पाठलाग करत कोयत्याने वार, मालेगावात तरुणाची निर्घृण हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Last Updated:

Malegaon News: नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात एक धडकी भरवणारी घटना घडली आहे. इथं रात्री उशिरा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.

malegaon murder news
malegaon murder news
बब्बू शेख, प्रतिनिधी मालेगाव: नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात एक धडकी भरवणारी घटना घडली आहे. इथं रात्री उशिरा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी पाठलाग करून लाकडी दांडके, धारदार शस्त्रांनी वार करून तरुणाचा जीव घेतला आहे. हत्येची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मालेगाव शहरातील बीडी गोडाऊन समोर घडली. 5 ते 7 जणांच्या टोळक्याने हातात हत्यारं घेऊन एका तरुणाचा पाठलाग केला आणि त्याचा निर्घृणपणे खून केला. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. सलीम शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. जुन्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
नेमका वाद काय झाला?
घटनेच्या वेळी मयत सलीम हा मालेगाव शहरातील अख्तराबाद भागातील बीडी गोडाऊनजवळ उभा होता. यावेळी सात ते आठ संशयित हातात लाठ्या, काठ्या, कोयते, तलवार घेऊन तिथे आले. त्यांनी फिर्यादी हनिफ यांचा भाऊ आणि त्याचा एक मित्र बिडी गोडाऊन अख्तराबाद येथे उभे असताना त्यांच्याजवळ जाऊन मागील भांडणाच्या कुरापतीतून धारदार तलवारीने सलीमच्या डोक्यावर मारहाण केली. तसेच अन्य जणांनी हातातील कोयत्याने सलीमच्या डोक्यावर व हातापायावर मारहाण केली. या गंभीर मारहाणीत सलीमचा मृत्यू झाला.
advertisement
खूनाची ही घटना उघडकीस येताच मालेगाव पोलिसांनी सात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मतीन मुल्ला, कलिम मतीन मुल्ला उर्फ कलिम नाट्या, शोएब अली, बिलाल, रियाज मोहम्मद, रिजवान, सैफ अली, (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. अख्तराबाद, मालेगाव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. घटनास्थळी कॅम्प विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड, पोलिस निरीक्षक आर. एस. खताळ यांनी भेट देऊन पाहणी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik: पाठलाग करत कोयत्याने वार, मालेगावात तरुणाची निर्घृण हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement