'या' 7 सीटर MPVची धडाधड होतेय विक्री! देते 26KM मायलेज; 6 एयरबॅग्सही, किंमत फक्त...
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
फेब्रुवारी 2026 मध्ये एका 7-सीटर कारची मागणी प्रचंड वाढलीये. ही कार सेफ्टी आणि फीचर्स दोन्हीच्या बाबतीत बेस्ट आहे. ज्यामुळे ती नंबर-1 वर आलीये.
भारतीय कार मार्केटमध्ये सध्या 7-सीटर कारची मागणी प्रचंड वाढलीये. कारण मोठ्या फॅमिली याच सेगमेंटच्या गाड्यांच्या शोधात असतात. गेल्या महिन्यातही हेच दिसलं. फेब्रुवारी 2026 मध्येही या सेगमेंटच्या 42,482 नव्या गाड्यांची विक्री झाली. फेब्रुवारी 2025 च्या सेलच्या 34,556 यूनिटच्या तुलनेत हा आकडा वार्षिक स्तरावर आलेली 23 टक्के वाढ दाखवतो.
advertisement
advertisement
Maruti Suzuki Ertiga : मारुती अर्टिगा टेबल टॉपर ठरलीये. गेल्या महिन्यात या 7-सीटर कारला 17,807 नवे ग्राहक मिळालेय. हा आकडा फेब्रुवारी 2025 मध्ये विकलेल्या याच्या एकूण 14,668 यूनिटच्या बाबतीत वार्षिक स्तरावर आलेली 19.80 टक्केंची शानदार वाढ दाखवतो. या कारची एक्स-शोरुम किंमत 8.80 लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप स्पेक व्हेरिएंटसाठी 12.94 लाख रुपयांपर्यंत जाते.
advertisement
डिझाइनही मॉर्डन : या कारची डिझाइन मॉडर्न आहे. यामध्ये बोल्ड फ्रंट ग्रिल आणि स्लीक LED लाइट्सचा समावेश आहे. स्पेसियस केबिन, प्रीमियम फॅब्रिक/लेदरेट सीट्स, 7-इंच टचस्क्रीन, ऑटो AC, क्रूझ कंट्रोल, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, रियर AC व्हेंट्स, पॉवर विंडोज, 6 एयरबॅग्स (टॉप व्हेरिएंट्स) , ABS सह EBD, ESP, रियर कॅमेरा आणि ISOFIX यांचाही फीचर्समध्ये समावेश आहे. याचे 1.5L पेट्रोल इंजिन 103 PS पॉवर आणि 137 Nm टॉर्क प्रोड्यूस करते. ग्राहक ही कार 5MT/6AT सह CNG ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता. ही कार पेट्रोलमध्ये 20.3-20.51 kmpl मायलेज देते. तर सीएनजीमध्ये 26.11 km/kg मायलेज देते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Toyota Rumion : रुमियनने सेगमेंटच्या टॉप-5 कारच्या यादीत आपलं नाव नोंदवलंय. गेल्या महिन्यात या कारचे एकूण 2817 यूनिट विकले. तर फेब्रुवारी 2025 मध्ये या कारचे 2099 यूनिट विकले होते. म्हणजेच वार्षिक स्तरावर या कारच्या विक्रीत 34 टक्क्यांची वाढ झालीये. वर पाहिल्या सर्वत सेगमेंटच्या टॉप-5 कारसोबतच गेल्या फेब्रुवारी महिन्यात Renault Triber चे 2419 यूनिट, Toyota Vellfire चे 145 यूनिट आणि Maruti Suzuki Invicto चे फक्त 143 यूनिटची विक्री झाली.









