Property Rules : हाऊसिंग सोसायटीच्या कमिटीचे सभासदत्व कधी रद्द होते? नियम काय सांगतो?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Housing Society Rules : हाऊसिंग सोसायटी कमिटी सदस्यत्व आणि सभासदत्व कधी संपते? याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो.
advertisement
कोणत्या परिस्थितीत सभासदत्व रद्द होते? गृहनिर्माण संस्थेत अनेक परिस्थितीत सभासदत्व समाप्त होते. जसे की, सभासदाने दिलेला राजीनामा संस्थेने अधिकृतपणे मंजूर केल्यास, संबंधित सभासदाचा भागदाखला (शेअर) दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित झाल्यास, सभासदाचा मृत्यू झाल्यास तसेच संस्थेच्या सर्वसाधारण सभेने सभासदत्व रद्द केल्यावर आणि त्या ठरावाला संबंधित उप/सहाय्यक निबंधकांनी कलम ३५ अंतर्गत मंजुरी दिल्यास ट्रस्ट, कंपनी किंवा फर्म स्वरूपातील सभासद संस्था विसर्जित झाल्यास किंवा त्यांची नोंदणी रद्द झाल्यास सभासदत्व रद्द होईल.
advertisement
advertisement
advertisement









