advertisement

Crime News : गोव्याची दारू गुजरातला, तस्करांनी पुष्पा स्टाइलनं डोकं चालवलं,पण महाराष्ट्रात पोलिसांनी गेम केला

Last Updated:

Karjat News : गोव्यातून गुजरातकडे अवैधरित्या दारू तस्करी करण्यासाठी तस्करांनी पुष्पा’ स्टाईल युक्ती लढवली. पण पोलिसांनी याबाबतची खबर मिळताच असं काही केलं की सर्व डाव मोडला.

नेरुळ पोलिसांनी टँकरमधून गुप्त कप्प्यांमध्ये लपवलेला विदेशी मद्यसाठा जप्त
नेरुळ पोलिसांनी टँकरमधून गुप्त कप्प्यांमध्ये लपवलेला विदेशी मद्यसाठा जप्त
कर्जत : पुष्पा हा चित्रपट प्रत्येकाच्या पसंतीचा होता आणि त्यात दाखवल्याप्रमाणे तस्करीचे प्रकार सर्वांनाच ठाऊक आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही ठिकाणी पुष्पा स्टाईल चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. सध्या असाच एक प्रकार उघडकीस आला असून महाराष्ट्र पोलिसांनी हा संपूर्ण कट हाणून पाडला आहे. ज्यात गोव्याहून गुजरातकडे टँकरमधून अवैधरित्या दारू वाहतूक केली जात होती.
टँकरमधील तस्करीचा डाव फसला
गोव्यातून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा हा गुजरातकडे तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर रायगड पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल, अपल पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल गायकवाड या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी एक पथक तयार केले.
या विशेष पथकाने कर्जत-मुरबाड आणि शहापूर राज्य महामार्गावर सापळा रचला आणि तपासणी सुरु केली. शनिवार रात्री साधारण 9 वाजता वारे गावच्या हद्दीत एक हॉटेल आहे त्याच्या समोर एक पाण्याचा टँकर संशयास्पदरीत्या आढळून आलेला असल्याने त्याची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना त्या टँकरमध्ये अनेक कप्पे तयार करुन विदेशी मद्यसाठी लपवून ठेवल्याचे दिसून आले.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Crime News : गोव्याची दारू गुजरातला, तस्करांनी पुष्पा स्टाइलनं डोकं चालवलं,पण महाराष्ट्रात पोलिसांनी गेम केला
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement