advertisement

Krushi Market : सोयाबीनच्या दरात तेजी तर कापूस स्थिर,टोमॅटो कारल्याची स्थिती काय? वाचा आजचे बाजारभाव

Last Updated:

Today Agriculture Market : राज्यातील कृषी बाजारपेठेत सध्या प्रमुख पिकांच्या दरात मिश्र चित्र पाहायला मिळत आहे. काही पिकांना चांगली मागणी असल्याने दर टिकून आहेत, तर काही पिकांवर वाढलेल्या आवकेचा दबाव दिसून येत आहे.

Today Agriculture Market
Today Agriculture Market
मुंबई : राज्यातील कृषी बाजारपेठेत सध्या प्रमुख पिकांच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. काही पिकांना चांगली मागणी असल्याने दर टिकून आहेत, तर काही पिकांवर वाढलेल्या आवकेचा दबाव दिसून येत आहे.
सोयाबीनला चांगला भाव
देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या दरांना सध्या स्थैर्य मिळाले आहे. आवक मर्यादित असताना सोयातेल आणि सोयापेंडला चांगली मागणी असल्यामुळे दराला आधार मिळत आहे.सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ५,२०० ते ५,५०० रुपये दर मिळत आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावामुळे खाद्यतेल आयात महागल्याने देशांतर्गत सोयातेलाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोयाबीनचे भाव स्थिर राहण्याचा अंदाज बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
advertisement
कापूस दर स्थिर
कापसाच्या बाजारातही गेल्या काही दिवसांपासून स्थिरता दिसून येत आहे. देशांतर्गत आणि निर्यातीची मागणी चांगली असल्यामुळे कापसाला उठाव मिळत आहे. सध्या कापसाला प्रतिक्विंटल ७,२०० ते ७,९०० रुपये दर मिळत आहे. याशिवाय, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) नेही विक्री दर स्थिर ठेवल्यामुळे पुढील काळात कापसाचे भाव स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
कारल्याच्या दरावर आवकेचा परिणाम
राज्यातील बाजारात कारल्याची आवक वाढल्याने दरावर काहीसा दबाव दिसून येत आहे. सध्या कारल्याला २,५०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मागणी चांगली असली तरी वाढलेल्या आवकेमुळे दरात चढ-उतार होत आहेत. काही भागांत वाढती उष्णता आणि पाणीटंचाईमुळे नव्या लागवडीवर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र मागणी टिकून असल्याने पुढील काळात दराला काही प्रमाणात आधार मिळू शकतो.
advertisement
गवार तेजीत कायम
गवारच्या बाजारात मात्र तेजी कायम आहे. कमी आवक आणि घटलेली लागवड यामुळे गवारला चांगला दर मिळत आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल ५,००० ते ७,००० रुपये दर मिळत आहे. पुढील काळातही आवक मर्यादित राहण्याची शक्यता असल्याने गवारचे भाव टिकून राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
टोमॅटो दर दबावात
टोमॅटोच्या बाजारात सध्या दबावाचे वातावरण आहे. विविध भागांत उत्पादन वाढल्याने बाजारात आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे टोमॅटोला सध्या प्रतिक्विंटल ८०० ते १,२०० रुपये दर मिळत आहे. येत्या काही दिवसांतही आवक चांगली राहण्याची शक्यता असल्याने दरावर दबाव कायम राहू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market : सोयाबीनच्या दरात तेजी तर कापूस स्थिर,टोमॅटो कारल्याची स्थिती काय? वाचा आजचे बाजारभाव
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement