Multiflex ला तिकिट 1400-2500 रुपये, त्यापेक्षा आपल्या 'भारतमाता'मध्ये स्वस्तात बघा 'धुरंधर', किती आहे तिकिट?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bharatmata Theatre Ticket Price : मुंबईकरांनो आपलं लाडकं भारतमाता टॉकिज पुन्हा सुरू झालं आहे. धुरंधरचं महागडं तिकिट काढण्यासाठी भारतामध्ये स्वस्तात बघा. किती आहे तिकिट प्राइज?
advertisement
1/8

सध्या सर्वत्र 'धुरंधर' सिनेमाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. सोशल मीडियावर ट्रेंडिंगपासून ते थिएटरबाहेरील हाऊसफुल्ल बोर्डपर्यंत या सिनेमाची क्रेझ आहे.
advertisement
2/8
या लोकप्रियतेसोबतच तिकिटांच्या वाढलेल्या दरांमुळे अनेक सर्वसामान्य प्रेक्षकांना हा सिनेमा पाहणं कठीण होत असल्याचं चित्र आहे.
advertisement
3/8
फिनिक्स, आयनॉक्स, मुव्ही मॅक्ससारख्या मल्टिप्लेक्समध्ये 'धुरंधर'च्या तिकिटांची किंमत तब्बल 1400 ते 2500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कुटुंबासह सिनेमा पाहणं अनेकांसाठी परवडणारे राहिलेलं नाही.
advertisement
4/8
दरम्यान लालबागमधील ऐतिहासिक भारतमाता टॉकीज पुन्हा सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांसाठी एक मोठा दिलासा मिळाला आहे. 'भारतमाता टॉकिज' या सिंगल-स्क्रीन थिएटरला मुंबईतील मराठी प्रेक्षकांचा विशेष जिव्हाळा आहे.
advertisement
5/8
गिरणी कामगारांपासून स्थानिक कुटुंबांपर्यंत अनेक पिढ्यांनी येथे सिनेमा पाहण्याचा आनंद घेतला आहे. तब्बल सहा वर्षांनी हे थिएटर आता नव्या रूपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
advertisement
6/8
नूतनीकरणानंतर भारतमाता टॉकीज नव्या सोयी-सुविधांसह सज्ज जालं आहे. या सगळ्यांतही सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथले तिकिट दर. 'धुरंधर'सारखा चर्चेत असलेला सिनेमा येथे फक्त 200 ते 300 रुपयांत पाहायला मिळत आहे.
advertisement
7/8
भारतमाता टॉकीज 24 मार्च 2026 पासून पुन्हा सुरू झालं. पण सुरुवातीला पहिल्या शोमध्ये मराठी सिनेमा न दाखवल्यामुळे काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. व्यवस्थापनाने तो केवळ ट्रायल शो असल्याचं स्पष्ट करत पुढील काळात मराठी चित्रपटांना प्राधान्य दिलं जाईल, अशी हमी दिली आहे.
advertisement
8/8
मल्टिप्लेक्सच्या महागड्या तिकिटांमुळे निराश झालेल्या प्रेक्षकांसाठी भारतमाता टॉकीज हा खऱ्या अर्थाने पर्याय ठरत आहे. विशेषतः मराठी सिनेमांवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांमध्ये या थिएटरबद्दल पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Multiflex ला तिकिट 1400-2500 रुपये, त्यापेक्षा आपल्या 'भारतमाता'मध्ये स्वस्तात बघा 'धुरंधर', किती आहे तिकिट?