TRENDING:

अजितदादांचा पायलट का बदलला? 57 दिवसांनी सत्य समोर, फडणवीसांनी आदल्या रात्रीचा घटनाक्रम ऑन रेकॉर्ड सांगितला!

Last Updated:

अजित पवारांच्या विमानाचे पायलट त्या दिवशी पायलट का बदलण्यात आले याविषयी देवेंद्र फडणवीसांनी हे सांगितले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांच्या विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते, असा आरोप केल्याने मोठी खळबळल उडाली होती. विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. अखेर 57 दिवसांनी फडणवीसांनी स्वत: त्या दिवशी पायलट का बदलण्यात आला हे सांगितले आहे. विधानसभेत अंतीम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
News18
News18
advertisement

मुंबईहून बारामतीला निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बारामतील येथील विमान दुर्घटना अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा दावा केला आहे. अजित पवारांच्या मृत्यूविषयी ना-ना प्रकारचे तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना रोहित पवारांच्या आरोप केल्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. आज देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात अपघाताविषयी चौकशीत जी माहिती समोर आली ती सभागृहात आज सादर केली.

advertisement

कोणत्या पायलटची नियुक्ती केली होती?

देवेंद्र फडणवीस म्हणाली, बारामती विमानतळावर विमान लँड होण्यापूर्वीच दुर्घटना झाली आहे. अजति पवारांच्या अपघाताचा सीआयडीकडून तपास सुरू आहे. पायलटची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आल्याचे तपासात समोर आले आहे. अजति पवारांच्या विमानाच्या पायलटची नेमणूक 27 जानेवारी रोजी रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी करण्यात आली होती. यावेळी तात्पुरत्या स्वरुपात विमानाचे क्रू डिटेल्समध्ये साहिल मदान आणि यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्टला करण्यात आला होता. अशा प्रकारे स्लॉट निश्चित करण्याची पद्धत आहे. त्यानंतर पायलट आणि को पायलटची नेमणूक करण्यात येते असे VSR कंपनीकडून सांगण्यात आले.

advertisement

पायलटची शिफ्ट का बदलण्यात आली? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
छंद असावा तर असा, तब्बल 10 हजार दुर्मिळ टपाल तिकिटाचा केला संग्रह, काय आहे खास? Video
सर्व पहा

व्हीएसआर कंपनीच्या ऑपरशेन टीमने शेड्युल दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंह को पायलट म्हणून 10 वाजून 42 मिनिटांनी नेमले, परंतु पायलट ओबेरॉय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांनी सकाळच्या फ्लाईटऐवजी संध्याकाळी लातूरला जाणाऱ्या प्लाईटवर ड्युटी द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर लगेच व्हीएसआरच्या टीमने त्यांच्याऐवजी सुमीत कपूर आणि को पायलट शांभवी पाठक यांची नेमणूक केली. त्यानंतर कंपनीने शिफ्ट रोस्टर व्हॉट्सअॅप ग्रुपवर रात्री 11 वाजून 54 मिनिटानी संबंधित पाठवले. त्यामुळे ऐनवेळी नेमणूक करण्यात आली नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांचा पायलट का बदलला? 57 दिवसांनी सत्य समोर, फडणवीसांनी आदल्या रात्रीचा घटनाक्रम ऑन रेकॉर्ड सांगितला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल