Crow : खिडकीत कावळा कावकाव करतोय.... हे अशुभ की अशुभ संकेत? ज्योतिषशास्त्रात काय आहे अर्थ?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कावळा हा असा पक्षी आहे, ज्याचा संबंध थेट आपल्या नशिबाशी आणि पूर्वजांशी जोडला जातो. ज्योतिष शास्त्रात कावळ्याला विशेष स्थान असून त्यासाठी स्वतंत्र 'काक शास्त्र' देखील अस्तित्वात आहे.
advertisement
1/9

सकाळची वेळ असते, आपण निवांत चहाचा कप हातात घेऊन बाल्कनीत किंवा खिडकीपाशी बसलेलो असतो. अचानक कुठूनतरी कावळ्याचा 'काव-काव' असा आवाज कानावर पडतो. आजच्या धावपळीच्या युगात आपण या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही, पण आपल्या घरातील आजी-आजोबा मात्र लगेच म्हणतात, "आज नक्कीच घरी कोणीतरी पाहुणे येणार"
advertisement
2/9
भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत निसर्गातील प्रत्येक हालचालीला काहीतरी अर्थ दिला गेला आहे. विशेषतः कावळा हा असा पक्षी आहे, ज्याचा संबंध थेट आपल्या नशिबाशी आणि पूर्वजांशी जोडला जातो. ज्योतिष शास्त्रात कावळ्याला विशेष स्थान असून त्यासाठी स्वतंत्र 'काक शास्त्र' देखील अस्तित्वात आहे. आज आपण जाणून घेऊया की तुमच्या बाल्कनीत किंवा छतावर येणारा कावळा तुम्हाला नेमके काय सांगण्याचा प्रयत्न करतोय.
advertisement
3/9
कावळा: यमराजाचा दूत आणि भविष्याचा आरसाशास्त्रानुसार, कावळ्याला शनि ग्रहाचे वाहन मानले जाते. 'काक शास्त्र' सांगते की, कावळ्यांमध्ये भविष्यात घडणाऱ्या घटनांचा पूर्वभास करण्याची विलक्षण शक्ती असते. त्यांना यमराजाचे दूतही मानले जाते, म्हणूनच त्यांच्या हालचालींमधून मिळणारे संकेत शुभ किंवा अशुभ असू शकतात.
advertisement
4/9
केव्हा होतो 'शुभ' शकुन? कावळ्याचा आवाज प्रत्येक वेळी भीतीदायक नसतो. खालील परिस्थितींमध्ये तो तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. -जर एखादा कावळा तुमच्या बाल्कनीच्या भिंतीवर बसून मोठ्याने ओरडत असेल, तर समजा तुमच्या घरी लवकरच पाहुणे येणार आहेत. -दुपारी कावळा उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ओरडत असेल, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. हे तुमच्या प्रगतीचे लक्षण आहे.
advertisement
5/9
-जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि त्याच वेळी खिडकीत कावळा ओरडला, तर समजून जा की तुमचा तो प्रवास सुखकर आणि यशस्वी होणार आहे.-कावळ्याला पाणी पिताना पाहणे हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देते. तसेच, जर कावळा चोचीत भाकरीचा तुकडा घेऊन उडताना दिसला, तर तुमची एखादी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असे समजावे.
advertisement
6/9
हे असू शकतात 'अशुभ' संकेतकाही वेळा कावळ्यांची हालचाल तुम्हाला सावध करण्यासाठी देखील असते.-जर तुमच्या घराच्या परिसरात कावळ्यांचा थवा एकत्र येऊन खूप गोंधळ घालत असेल, तर तो अपशकुन मानला जातो. हे कुटुंबावर येणारे संकट किंवा आजारपणाचे लक्षण असू शकते.
advertisement
7/9
-जर कावळा दक्षिण दिशेला बसून ओरडत असेल, तर ते अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार, तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज असू शकतात किंवा तुम्हाला 'पितृदोष' असू शकतो, असे याचे संकेत आहेत.
advertisement
8/9
नेहमीच आपल्याला विविध माध्यमातून संदेश देत असतो. कावळा हा त्यातीलच एक महत्त्वाचा दुवा आहे. जरी विज्ञान या गोष्टींना केवळ पक्ष्यांचा नैसर्गिक स्वभाव मानत असले, तरी श्रद्धेपोटी अनेकजण आजही या संकेतांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे पुढच्या वेळी कावळा तुमच्या घरापाशी आला, तर तो नेमका काय संकेत देतोय हे तपासायला विसरू नका.
advertisement
9/9
(टीप: वरील माहिती केवळ लोकमान्यता आणि इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवर आधारित आहे. News 18 मराठी याची पुष्टी करत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Crow : खिडकीत कावळा कावकाव करतोय.... हे अशुभ की अशुभ संकेत? ज्योतिषशास्त्रात काय आहे अर्थ?