OTT Release : वॅलेंटाइन वीकनंतर ओटीटीवर आली थिएटरमधील ही रोमँटिक फिल्म; अॅक्शन, थ्रीलर, हॉररही
- Published by:Priya Lad
Last Updated:
OTT Release Film And Web Series : जर तुम्ही घरी नवीन चित्रपट आणि वेब सीरीज पाहण्याचा विचार करत असाल, तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. ज्या वेब सीरिज आणि फिल्म्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापैकी काही ओटीटीवर येत आहेत.
advertisement
1/5

ओटीटी </a>प्लॅटफॉर्मवर बॉलिवूडपासून ते साऊथ आणि हॉलिवूड फिल्मपर्यंत रोमान्स, अॅक्शन, थ्रिलर, हॉरर असा मनोरंजनाचा पूर्ण डोस मिळेल." width="1600" height="900" /> फेब्रुवारीचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे आणि अनेक वेब सीरिज आणि फिल्म Netflix, Jio Hotstar, Zee5 या ओटीटीवर रिलीज होत आहेत. 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉलिवूडपासून ते साऊथ आणि हॉलिवूड फिल्मपर्यंत रोमान्स, अॅक्शन, थ्रिलर, हॉरर असा मनोरंजनाचा पूर्ण डोस मिळेल.
advertisement
2/5
'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' ही कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांची रोमँटिक कॉमेडी फिल्म डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाली होती. आता 19 फेब्रुवारीपासून ती प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
advertisement
3/5
सनी लिओनीची 'केनेडी' ही क्राईम थ्रीलर फिल्म 20 फेब्रुवारी रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या फिल्मची स्टोरी रहस्य, गुन्हेगारी आणि भावनांनी भरलेली आहे. 'लकी द सुपरस्टार' ही फिल्मसुद्धा 20 फेब्रुवारीला प्राइम व्हिडिओवर येईल.
advertisement
4/5
द साऊथ इंडियन फिल्म राक्षस आणि चठ्ठा पचा या थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवर येत आहेत. राक्षस 20 फेब्रुवारीला Zee5 वर तर चठ्ठा पचा 19 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.
advertisement
5/5
56 डेज ही नवीकोरी वेबसीरिज 18 फेब्रुवारीला प्राइम व्हिडिओवर येणार आहे. तसंच आणि द नाईट एजंट 3 ची प्रतीक्षाही आता संपली आहे. नवीन ट्विस्ट आणि रोमांचक कथानकासह द नाईट एजंट सीरिजचा तिसरा सीझन 19 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Release : वॅलेंटाइन वीकनंतर ओटीटीवर आली थिएटरमधील ही रोमँटिक फिल्म; अॅक्शन, थ्रीलर, हॉररही