
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी अपघात झाला. अजित पवारांचा अपघात नसून हा घातपात असल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या. अजित पवारांचा अपघात हा एका कटाचा भाग असू शकतो. त्यांच्यासोबत घातपात घडल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. सरकारी तपास यंत्रणा योग्य प्रकारे तपास करत नसल्याने रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास करण्यासाठी खासगी गुप्तहेर संस्थेशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे.