उद्याचा दिवस महत्वाचा! सूर्यग्रहण आणि अग्नी पंचक एकाच दिवशी, अनर्थ टाळायचा असेल तर घ्या 'ही' काळजी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी 9:05 वाजल्यापासून 'अग्नि पंचक' देखील सुरू होत आहे.
advertisement
1/7

17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी 9:05 वाजल्यापासून 'अग्नि पंचक' देखील सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा पंचक मंगळवारपासून सुरू होते, तेव्हा त्याला 'अग्नि पंचक' म्हटले जाते.
advertisement
2/7
सूर्यग्रहण आणि अग्नि पंचक यांचा हा दुर्मिळ संयोग अनिष्ट घटनांचे संकेत देणारा मानला जातो. या काळात केलेली एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा मोठ्या नुकसानाला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे 21 फेब्रुवारीपर्यंत सर्वांनीच विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
advertisement
3/7
जेव्हा चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्रांमधून प्रवास करतो, तेव्हा त्या काळाला 'पंचक' म्हणतात. मंगळवार हा अग्नीचा कारक असलेल्या मंगळ ग्रहाचा वार आहे.
advertisement
4/7
त्यामुळे या दिवशी सुरू होणारे पंचक आगीशी संबंधित दुर्घटना, अपघात आणि वादाचे प्रतीक मानले जाते. उद्याच्या सूर्यग्रहणामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा वाढलेली असेल, त्यातच अग्नि पंचक सुरू होत असल्याने 'अग्नी' आणि 'यंत्रसामग्री'शी संबंधित कामात धोका वाढतो.
advertisement
5/7
आगीशी संबंधित कामात सावधगिरी: अग्नि पंचक काळात शॉर्ट सर्किट, गॅस गळती किंवा आगीच्या घटना घडण्याची शक्यता जास्त असते. घरात किंवा कारखान्यात आगीशी संबंधित कोणतेही नवीन काम सुरू करू नका. वीजेची उपकरणे हाताळताना दुप्पट काळजी घ्या.
advertisement
6/7
यंत्रसामग्री आणि अवजारांची खरेदी टाळा: मंगळवारी सुरू होणाऱ्या या पंचकात लोखंडी वस्तू, यंत्रसामग्री, शस्त्रे किंवा अवजारे खरेदी करणे टाळावे. यामुळे कामात अडथळे येऊ शकतात किंवा अपघात होण्याची भीती असते.
advertisement
7/7
शुभ कार्यांना ब्रेक: जरी काही कामांसाठी पंचक शुभ असले तरी, 'अग्नि पंचक' हे आक्रमक असल्याने विवाह, मुंडन किंवा गृहप्रवेश यांसारखी महत्त्वाची शुभ कार्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नयेत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
उद्याचा दिवस महत्वाचा! सूर्यग्रहण आणि अग्नी पंचक एकाच दिवशी, अनर्थ टाळायचा असेल तर घ्या 'ही' काळजी