Success Story : कोरडवाहू शेतीसाठी दुसऱ्याकडून पाणी घेत केली टोमॅटो लागवड, आता वर्षाला 7 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
तरुण शेतकरी दयानंद पवार यांनी असाच प्रयोग केला आहे. त्यांनी परिस्थितीवर मात करत टोमॅटो शेतीमधून लाखोंचे उत्पन्न कमावले आहे.
advertisement
1/5

शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील तरुण शेतकरी दयानंद पवार यांनी असाच प्रयोग केला आहे. त्यांनी परिस्थितीवर मात करत टोमॅटो शेतीमधून लाखोंचे उत्पन्न कमावले आहे.
advertisement
2/5
तरुण शेतकरी दयानंद पवार यांना तीन एकर जमीन आहे. त्यांची शेती कोरडवाहू आहे. पाण्याचा कोणताही स्रोत नसतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि सुयोग्य नियोजनाच्या जोरावर शेतीतून नफा मिळवला आहे.
advertisement
3/5
गेल्या तीन वर्षांपासून ते दीड एकरमध्ये टोमॅटो लागवड करतात. सुरुवातीला पाण्याअभावी अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांनी हार न मानता मित्राच्या बोअरवेलमधून पाणी घेण्याची सोय करून शेती चालू ठेवली.
advertisement
4/5
पाण्याची टंचाईची येणारी अडचण लक्षात घेता त्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला. यामुळे कमी पाण्यातही पिकांची चांगली वाढ साधता आली. टोमॅटोसोबतच त्यांनी हंगामानुसार विविध पालेभाज्यांची लागवड केली. यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत झाली. बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य वेळ साधून विक्री केल्यामुळे त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळू लागला.
advertisement
5/5
सध्या टोमॅटो शेतीतून दरवर्षी 6 ते 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. मर्यादित साधनसामग्री असूनही योग्य तंत्रज्ञान आणि नियोजन वापरल्यास शेतीत चांगला नफा मिळवता येतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : कोरडवाहू शेतीसाठी दुसऱ्याकडून पाणी घेत केली टोमॅटो लागवड, आता वर्षाला 7 लाख कमाई