रस्त्यावरच डेव्हिड वॉर्नरची तपासणी करण्यात आली ज्यात तो पॉझिटिव्ह आढळला, त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि दुसऱ्यांदा त्याची अल्कोहोल टेस्ट केली गेली, या टेस्टमध्ये वॉर्नरची अल्कोहोल लेव्हल 0.104 एवढी आली. ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार ही अल्कोहोल लेव्हल दुप्पट होती, त्यामुळे वॉर्नरला अटक करून कोर्टात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली.
काय म्हणाले पोलीस?
advertisement
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार 5 एप्रिल 2026 ला संध्याकाळी साडेपाच वाजता पोलीस मारूब्राच्या मलबार रोडवर रँडम ब्रीथ टेस्ट करत होते, तेव्हा एक कार टेस्टिंग पॉईंटच्या आधी थांबून पार्क करण्यात आली, त्यानंतर पोलीस गाडीजवळ गेले आणि 39 वर्षांच्या ड्रायव्हरची टेस्ट केली गेली. या टेस्टमध्ये ड्रायव्हर पॉझिटिव्ह आला, त्यामुळे त्याला अटक करून मारूब्रा पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं. पोलीस स्टेशनमध्ये त्याची दुसरी टेस्ट केली असता त्याची अल्कोहोल लेव्हल 0.104 आली. या प्रकरणी आरोपीला कोर्टात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. गुरूवार 7 मे 2026 रोजी त्याला डाऊनिंग सेंटर लोकल कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे.
क्रिकेट विश्वास खळबळ
डेव्हिड वॉर्नरला अटक झाल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे, कारण डेव्हिड वॉर्नर हे नाव वर्ल्ड क्रिकेटमध्ये मोठं आहे. वॉर्नरने 2024 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण तो अजूनही जगभरातल्या वेगवेगळ्या लीगमध्ये खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये तो सिडनीचा कर्णधार आहे.
PSL मध्ये पुन्हा खेळणार का नाही?
डेव्हिड वॉर्नर हा पाकिस्तान सुपर लीगच्या 2026 च्या मोसमात खेळत होता. पीएसएलमध्ये वॉर्नर कराची किंग्सचा कर्णधार होता. पीएसएलमध्ये कराची किंग्सने 3 पैकी 3 सामने जिंकले आहेत, त्यामुळे कराची पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
डेव्हिड वॉर्नरला ब्रेक
कराची किंग्सच्या पुढच्या सामन्याआधी डेव्हिड वॉर्नरसह काही खेळाडूंना थोड्या काळासाठी ब्रेक देण्यात आला होता. त्यामुळे वॉर्नर कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला परत गेला होता. 9 एप्रिलला पेशावर झाल्मीविरुद्ध होणाऱ्या पुढच्या सामन्याआधी खेळाडूंना परत यायला पीएसएलने सांगितलं होतं. आता कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकल्यामुळे वॉर्नर पीएसएल खेळण्यासाठी परत येणार का नाही? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. यंदाच्या पीएसएलमध्ये आझम खान आणि डेव्हिड वॉर्नर रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉपवर आहेत.
