फिल्टरपाड्याचा बच्चन! ताडपत्रीचं घर ते पवईमध्ये लॅव्हिश फ्लॅट, गौरव मोरेच्या आलिशान घराचे Inside Photos
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gaurav More New Home Inside Photos : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरेनं त्याच्या नव्या घरात प्रवेश केला. कसं आहे गौरव मोरं पवईतील आलिशान घर? पाहा घराचे इनसाइड फोटो.
advertisement
1/9

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजेच गौरव मोरे. 'फिल्टर पाड्याचा बच्चन' अशी एक नवी ओळख गौरवला या शोमधून मिळाली. गौरवच्या आयुष्यात सध्या आनंदी आनंद आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला पवई येथे म्हाडाच्या लॉटरीत घर मिळालं आणि नुकताच त्याने त्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
advertisement
2/9
गौरवने आपल्या या प्रवासाबद्दल सोशल मीडियावर भावना व्यक्त करताना म्हटलं होतं की, "फिल्टरपाडा ते पवई हा प्रवास पाहताना खूप छोटा वाटतो पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली."
advertisement
3/9
गौरव मोरे किती मोठा कलाकार झाला तरी त्याचा फिल्टरपाडा तो विसलेला नाही. गौरवने आपल्या नव्या घराबाहेर 'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी नेमप्लेट लावली आहे.
advertisement
4/9
गौरवच्या या आलिशान घरात पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. त्याने घरात प्रवेश करताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला. गौतम बुद्धांची मूर्ती देखील घरी विराजमान करण्यात आली आहे. ज्यातून त्याच्या विचारांची झलक दिसून आली.
advertisement
5/9
घराच्या बाहेर मोठी आणि हवेशीर बाल्कनी आहे, जिथून पवई परिसराचा नजारा पाहायला मिळतो. गौरवचं हे घर 2 BHK फ्लॅट आहे.
advertisement
6/9
गौरवने संपूर्ण घराच्या इंटिरिअरमध्ये निळा, गुलाबी आणि पांढरा अशा रंगसंगतीचा वापर केला आहे. ज्यामुळे त्याच्या घराला आकर्षक आणि फ्रेश लुक मिळला आहे.
advertisement
7/9
याशिवाय गौरवच्या घरातील किचनही खूप मोठं आणि आधुनिक सुविधांनी सज्ज आहे. मोठा किचन ओटा, आधुनिक उपकरणं आणि व्यवस्थित डिझाइनमुळे ते अत्यंत सोयीस्कर बनलं आहे.
advertisement
8/9
ताडपत्रीच्या घरातून प्रवास करत आज पवईमध्ये आलिशान फ्लॅटपर्यंत पोहोचलेला गौरव मोरेचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश मिळवलं आहे. त्याच्या नव्या घरासाठी चाहत्यांनी त्याला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
9/9
गौरव मोरेनं नव्या घरात गृहप्रवेश करण्याआधी लग्न देखील केलं. प्रियंका कारेकर असं त्याच्या बायकोचं नाव आहे. लग्न आणि घर अशी दोन्ही स्वप्न त्याने पूर्ण केलीत. गौरवने त्याच्या नव्या घरात नव्या संसाराची सुरूवात केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फिल्टरपाड्याचा बच्चन! ताडपत्रीचं घर ते पवईमध्ये लॅव्हिश फ्लॅट, गौरव मोरेच्या आलिशान घराचे Inside Photos