Loan : होम लोन घेण्यासाठी परफेक्ट वय कोणतं? तुम्ही उशीर तर नाही करत आहे ना? तज्ज्ञ काय सांगतात वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Home Loan Right Age : अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न असतो की, होम लोन घेण्यासाठी योग्य वय कोणतं? कुणी म्हणतं विशीत कर्ज घ्या, तर कुणी म्हणतं विशीनंतर करिअर स्थिर झाल्यावर विचार करा. प्रत्येक वयात कर्ज घेण्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटेही असतात. चला तर मग, तुमच्या वयानुसार होम लोनचं गणित कसं बदलतं, याचा सविस्तर आढावा घेऊया.
advertisement
1/8

"स्वतःचं घर असावं," असं स्वप्न प्रत्येकाला वाटतंच. मुलानं लहान वयात घर घेतलं तर आई-वडिलांसाठी तर ही अभिमानाची गोष्ट असते. लोक आपल्या सोयीप्रमाणी घर घेतात मग तो नुकताच नोकरीला लागलेला तरुण असो किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला एखादा अनुभवी व्यक्ती. भाड्याच्या घरातून हक्काच्या वास्तूत जाण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत करतो. पण आजच्या काळात घरांच्या वाढत्या किमती पाहता, खिशातल्या पैशातून थेट घर घेणं जवळपास अशक्य झालंय. अशा वेळी आपला सर्वात मोठा आधार ठरतं ते म्हणजे होम लोन.
advertisement
2/8
होम लोन घेणं ही केवळ आर्थिक प्रक्रिया नाही, तर ते एक दीर्घकालीन नियोजन आहे. अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न असतो की, होम लोन घेण्यासाठी योग्य वय कोणतं? कुणी म्हणतं विशीत कर्ज घ्या, तर कुणी म्हणतं विशीनंतर करिअर स्थिर झाल्यावर विचार करा. प्रत्येक वयात कर्ज घेण्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटेही असतात. चला तर मग, तुमच्या वयानुसार होम लोनचं गणित कसं बदलतं, याचा सविस्तर आढावा घेऊया.
advertisement
3/8
20 वर्षांच्या आत किंवा विशीच्या सुरुवातीला: 'लॉन्ग टर्म'चा फायदाविशीच्या सुरुवातीला जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही खूप पुढचा विचार करत आहात.- फायदा: या वयात तुम्हाला कर्जासाठी Tenure मिळतो. जितका Tenure जास्त, तितका तुमच्या मासिक हप्त्याचा (EMI) बोजा कमी होतो. तसेच, तुमच्या मालमत्तेची किंमत वाढण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतो.-तोटा: या वयात करिअर नुकतंच सुरू झालेलं असतं, त्यामुळे उत्पन्न मर्यादित असू शकतं. डाउन पेमेंटसाठी लागणारी मोठी रक्कम जमवणं या वयात थोडं कठीण जाऊ शकतं.
advertisement
4/8
20 वर्षांनंतर (After 20s): स्थिरता आणि संधीबहुतेक तरुण हे वयाच्या 25-26 व्या वर्षी घराचा गंभीर विचार करू लागतात.- फायदा: या काळात करिअर स्थिर होऊ लागतं आणि पगारही वाढतो. त्यामुळे बँकेकडून कर्ज मिळणं सोपं जातं. लवकर घर घेतल्यामुळे रिअल इस्टेट मार्केटमधील दरवाढीचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळतो.-तोटा: या वयात लग्न किंवा फॅमिली प्लॅनिंग यांसारख्या नवीन जबाबदाऱ्या समोर येतात, ज्यामुळे तुमच्या आर्थिक प्राधान्यांमध्ये बदल होऊ शकतो.
advertisement
5/8
तिशीचं वय (In your 30s): गृहखरेदीचा 'गोल्डन पिरीयड'तज्ज्ञांच्या मते, 30 ते 40 हे वय घर खरेदीसाठी सर्वात उत्तम मानलं जातं.- फायदा: या वयात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असते. तुमचा अनुभव आणि पगार पाहून बँका तुम्हाला आकर्षक व्याजदराने कर्ज देऊ शकतात. कुटुंब वाढवण्याच्या दृष्टीने स्वतःचं घर असणं हा एक सुरक्षित निर्णय ठरतो.-तोटा: या वयात घर घेतल्यास, मालमत्तेच्या किमतीत होणाऱ्या वाढीचा जो फायदा विशीत घेता आला असता, तो थोडा कमी मिळतो.
advertisement
6/8
चाळीस वर्षांनंतर (After 40s): अजूनही वेळ गेलेली नाहीअनेकांना वाटतं की चाळीशीनंतर होम लोन घेणं खूप उशीर झाला आहे, पण तसं मुळीच नाही.- फायदा: या वयात तुम्ही खूप विचारपूर्वक आणि नियोजित आर्थिक निर्णय घेता. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी स्वतःची हक्काची वास्तू असणं हा एक मोठा मानसिक आधार असतो.- तोटा: या वयात कर्जाचा कालावधी कमी मिळतो. उदाहरणार्थ, 60 व्या वर्षी निवृत्त व्हायचे असेल, तर तुम्हाला फक्त 20 वर्षांची मुदत मिळते. कालावधी कमी असल्यामुळे EMI ची रक्कम मोठी असते.
advertisement
7/8
होम लोन घेण्यासाठी कोणतंही वय चुकीचं नसतं, फक्त तुमची तयारी आणि नियोजन योग्य असावं लागतं. तुम्ही जेवढ्या लवकर सुरुवात कराल, तितका व्याजाचा बोजा कमी होईल, पण चाळीशीत घेतलेला निर्णय अधिक प्रगल्भ असू शकतो. तुमच्या गरजेनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार योग्य वेळी पाऊल उचला.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Loan : होम लोन घेण्यासाठी परफेक्ट वय कोणतं? तुम्ही उशीर तर नाही करत आहे ना? तज्ज्ञ काय सांगतात वाचा