Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अमोनियम नायट्रेटचा टँकर लीक, प्रशासनाची धावपळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Samruddhi Mahamarg: संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि वाहनांना सुरक्षित अंतरावरून वळवण्यात आले.
advertisement
1/7

जालना जिल्ह्यातील गुंडेवाडी शिवारातील समृद्धी महामार्गावर अमोनियम नायट्रेटने भरलेला एक टँकर लीक झाल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ पावले उचलत संबंधित मार्गावरील वाहतूक बंद केली.
advertisement
2/7
संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि वाहनांना सुरक्षित अंतरावरून वळवण्यात आले.
advertisement
3/7
पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी तसेच अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.
advertisement
4/7
तज्ज्ञांच्या मदतीने अग्निशमन दलाकडून टँकरमधील गळती थांबवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. दरम्यान टँकरला सुरक्षित ठिकाणी हलवून बाजूला उभा करण्यात आला आहे.
advertisement
5/7
टँकरमधील रसायन दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्याची प्रक्रिया रात्री पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
6/7
ही घटना काल सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली होती. त्यानंतर जवळपास 24 तासांहून अधिक काळ प्रशासनाकडून कारवाई सुरू होती आणि आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे
advertisement
7/7
24 तासानंतर टँकर मोकळ्या जागेवर हलवण्यात आला असून मोठा अनर्थ टळला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अमोनियम नायट्रेटचा टँकर लीक, प्रशासनाची धावपळ