TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : म्हणे, 'राखून ठेवलं होतं ते राखीसाठी! ... अन् सागर कारंडेने ड्रामा क्वीनसमोर अंगावरचे कपडे काढले

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant Sagar Karande : बिग बॉस मराठी 6 सुरू झाल्यापासून 37 दिवसांत सागर कारंडेने जे केलं नाही ते त्याने आता पहिल्यांदाच राखी सावंतसाठी केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी 6 च्या घरात सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. काहीतरी अनपेक्षित घडतं आहे. या आठवड्यातही असंच काहीतरी घडताना दिसलं, ज्याचा कुणी विचारही केला नसेल. गेल्या आठवड्यात एकमेकांशी भांड भांड भांडलेले राखी सावंत आणि सागर कारंडे यांच्यात प्रेम फुलताना दिसत आहे.
News18
News18
advertisement

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा सातव्या आठवड्यातील पहिल्या दिवसाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात सागर कारंडे राखी सावंतला इम्प्रेस करताना दिसतो आहे. प्रोमोच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता राखी बेडवर बसली आहे आणि सागरने आपल्या अंगावरील कपडे म्हणजे शर्ट काढला आहे.

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या डोक्यात गेली राखी सावंत, लावली वाट! हात धरून खेचत घराबाहेर काढलं, पण का?

advertisement

सागर राखीला बोलतो, "राखी हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे" आणि तो छातीवर हात मारून छाती थोपटतो. तेव्हा तिथं असलेला विशाल कोटियन जो सागरने अंगावरील काढलेले कपडे हातात घेऊन येतो आणि राखीला सांगतो, 37 दिवस झाले, मी यांना असं कधीच पाहिलं नाही. त्यावर सागर म्हणतो, मी ते राखून ठेवलं होतं, स्पेशल लोकांसाठी. राखून ठेवलं होतं ते राखीसाठी होतं. विशाल त्याला काय राखून ठेवलं होतं असं विचारतो.

advertisement

इतक्यात मागून सचिन कुमावतही तिथं येतो. तो सागरच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आपली हाइट, पर्सनलिटी दाखवतो. यावर सागर म्हणतो, 'कुछ मायने नहीं रखता' मधेच विशाल बोलतो, 'डिम्पल मायने रखता है डिम्पल' सागरही आपले डिम्पल दाखवत ओरडतो. शेवटी सागर 'ए पुष्पा आय लव्ह यू रे' असं म्हणतो.

राखीला इम्प्रेस करण्यासाठी जणू पुरुषांमध्ये स्पर्धाच लागली आहे. हे पाहून राखीचाही चेहरा खुललेला दिसतो. आता हे काही खरंखुरं प्रेम नाही तर सागर कारंडे राखीशी फ्लर्टिंग करतो आहे, ही मजामस्ती सुरू आहे. हे दिसून येतं.

advertisement

राखी सावंत आणि सागर कारंडेचं भांडण

दोन दिवसांपूर्वी राखी आणि सागरमध्ये साफसफाईवरून वाद झाला होता. बाथरूममध्ये घाण पाहून राखी भडकते. ती सागरला ते दाखवते आणि हे स्वच्छ करा असं सांगते. पण सागर साफसफाई करायला थेट नकार देतो.

Bigg Boss : बिग बॉस विजेता अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यात वादळ, घेतोय घटस्फोट? म्हणाला, 'माझी बायको...'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिळे अन्न खाताय? वेळीच थांबवा सवय, नाहीतर हे होतील गंभीर परिणाम
सर्व पहा

सागर राखीला म्हणतो, "तू मला सांगू नकोस. मी वॉचमन नाही. मी साफ करणार नाही" यानंतर राखी भडकून म्हणते, "हे तुम्हाला करावं लागेल. आम्ही पण जेवण बनवतो ना. ते खाता ना तुम्ही? मग नाटकं का करता?" असं बोलून राखी वॉशरूम एरियाच्या बाहेर येते आणि रागात किचनमध्ये जाते. तिथं येऊन ती काचेची वस्तू फोडते.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : म्हणे, 'राखून ठेवलं होतं ते राखीसाठी! ... अन् सागर कारंडेने ड्रामा क्वीनसमोर अंगावरचे कपडे काढले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल