TRENDING:

Health Tips : शिळे अन्न खाताय? वेळीच थांबवा सवय, नाहीतर हे होतील गंभीर परिणाम

Last Updated:

हीच सवय आरोग्यासाठी धोक्याची ठरू शकते. वारंवार शिळे अन्न खाल्ल्याने शरीरावर हळूहळू विपरीत परिणाम होऊ शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : घरातील सगळ्यांची भूक भागवताना अनेक गृहिणी स्वतःच्या ताटात मात्र उरलेलेच अन्न घेतात. अन्नाची नासाडी नको किंवा बचतीची सवय यामुळे कालचा भात, भाजी किंवा पोळ्या दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याची पद्धत अनेक घरात दिसते. पण हीच सवय आरोग्यासाठी धोक्याची ठरू शकते. वारंवार शिळे अन्न खाल्ल्याने शरीरावर हळूहळू विपरीत परिणाम होऊ शकतो, शिळं अन्न हे शरीरासाठी स्लो पॉयझिनिंग ठरू शकते असा इशारा आहारतज्ज्ञ डॉ. शिवाजी जाधव यांनी दिला आहे.
advertisement

सध्याच्या धावपळीच्या युगात वेळ वाचविण्यासाठी किंवा रात्री उरलेले अन्न फेकून देणे जिवावर येते म्हणून ते फ्रिजमध्ये ठेवले जाते. फ्रिजमध्ये अन्न ठेवल्याने ते सुरक्षित राहते, हा एक मोठा गैरसमज आहे. फ्रिजमधील अन्नाचे पोषक घटक कालांतराने कमी होतात. शिवाय उष्ण आणि दमट वातावरणात अन्नामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात. नुसत्या वासावरून अन्न चांगले आहे की खराब हे ओळखणे चुकीचे आहे. शिळ्या अन्नावर बुरशीजन्य घटक तयार होतात.

advertisement

Success Story : शेतीला दिली व्यवसायाची जोड, 2 गुंठ्यात केलं कोंबडी पालन, वर्षाला 4 लाख कमाई

शिळं अन्न खाल्ल्याने आरोग्याला मोठे धोके

शिळं अन्न खाल्ल्याने अन्नातील हानिकारक बॅक्टेरियामुळे उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखी होऊ शकते. तसेच काही ॲलर्जीच्या प्रकारांना सामोरे जावे लागू शकते, अन्नामुळे पोटाचे विकार आणि ॲसिडिटी वाढते हे लक्षात घ्यायला पाहिजे. शिळे, उघडे अन्न खाल्ल्यास विषबाधा देखील होऊ शकते.

advertisement

रात्रीची पोळी-भाजी खाऊ नका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकर आजही पितात ब्रिटिशांनी उभारलेल्या वाड्यातून दूध, आजही आहे 1500 गायी-म्हशी
सर्व पहा

महिलांना रात्रीची पोळी-भाजी किंवा भात सकाळी फोडणी देऊन नाश्ता म्हणून खाण्याची सवय असते. नोकरदार महिला वेळेअभावी हेच अन्न गरम करून खातात. मात्र वारंवार गरम केल्याने त्यातील सत्त्व पूर्णपणे नष्ट होते. अन्न वाया जाऊ नये म्हणून ते खाण्यापेक्षा, ते तितकेच शिजवणे किंवा गरजू प्राण्यांना देणे केव्हाही चांगले. पण शिळे खाणे टाळणे आणि जास्तीत जास्त ताजे अन्न खाल्ले पाहिजे, असे आवाहन देखील जाधव यांनी केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : शिळे अन्न खाताय? वेळीच थांबवा सवय, नाहीतर हे होतील गंभीर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल