आजही या परिसरात सुमारे 100 ते 150 कुटुंबे वास्तव्यास असून त्यापैकी 60 ते 70 कुटुंबे प्रत्यक्ष दूध व्यवसायात कार्यरत आहेत. या वाड्यात अंदाजे 1000 ते 1500 गायी-म्हशींचे संगोपन केले जाते. दररोज हजारो लिटर दूध संकलित करून शहरातील विविध भागांत रतिबा पद्धतीने पुरवठा केला जातो. छावणी परिसरातील हा सर्वात मोठा गवळी वाडा मानला जातो.
advertisement
Agriculture News : आता हार्वेस्टरचे व्हा मालक! शेतकऱ्यांना 35 लाखांचे मिळतंय अनुदान, कुठे कराल अर्ज?
पुण्यातील पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार दुधाची मागणी वाढली असली तरी पारंपरिक पद्धतीने चालणारा हा व्यवसाय आजही टिकून आहे. कॅम्पव्यतिरिक्त येरवडा, घोरपडी, केशवनगर आणि सहकारनगर या भागांतही गवळी वाडे आहेत; मात्र कॅम्पमधील वाडा आकाराने आणि दूध उत्पादनाने मोठा आहे.
म्हशींची खरेदी प्रामुख्याने हरियाणा, गुजरात, पंजाब आणि दिल्ली या राज्यांतून केली जाते. हरियाणातील प्रसिद्ध मुर्रा जातीच्या म्हशी तसेच गुजरातमधील जाफराबादी जातीला विशेष मागणी आहे. गायींमध्ये देशी, जर्सी अशा आठ ते दहा प्रजातींचा समावेश आहे. विशेषतः मुर्रा जातीची म्हैस दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची असते. उत्तम प्रतीचे दूध मिळावे यासाठी उच्च प्रतीचा चारा आणि पोषक आहार दिला जातो.
या व्यवसायाला सात ते आठ पिढ्यांची परंपरा लाभली आहे. बदलत्या शहरीकरणात जागेची कमतरता, चाऱ्याचे वाढते दर आणि देखभालीचा खर्च ही आव्हाने असली तरी गवळी समाजाने परंपरा जपली आहे. चांगल्या दुधासाठी जनावरांना उच्च प्रतीचा खाऊ देणे आवश्यक असते, अशी माहिती स्थानिक व्यावसायिक शंकर बिडकर यांनी दिली.
शहराच्या आधुनिकीकरणाच्या लाटेतही कॅम्पमधील गवळी वाडा हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहासाचा जिवंत वारसा ठरतो आहे. हजारो कुटुंबांच्या सकाळची सुरुवात ज्या ताज्या दुधाने होते, त्या मागे या वाड्यातील कष्ट, परंपरा आणि सातत्याची कहाणी दडलेली आहे.





