advertisement

Ajit Pawar: अजित पवार विमान अपघात प्रकरण नवी अपडेट, 'त्या' विमानाची कुंडली येणार समोर

Last Updated:

या तपासणीला पुढील १० ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेकडून खाजगी विमान कंपनीच्या विविध कागदपत्रांचीही पडताळणी होणार आहे.

News18
News18
पुणे : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहे. आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. अजितदादांनी जे विमान वापरलं होतं, त्या विमानाची प्रवास क्षमता किती आहे आणि उड्डाण योग्य आहे, याचा तपास होणार आहे. या चौकशीमुळे विमान अपघात प्रकरणी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान कोसळून निधन झालं. अजितदादा VSR या खासगी कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. मुंबईहून बारामती येत असताना सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ज्या VSR कंपनीचं हे विमान होतं, त्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थितीत झाले. या प्रकरणीची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयांतर्गत असलेली AAIB ही संस्था तपास करत आहे.
advertisement
आता या प्रकरणाच्या तपासात नवी माहिती समोर आली आहे.  विमानाच्या एअरवर्थिनेस म्हणजेच हवाई प्रवासक्षमता आणि विमानाची उड्डाण योग्यतेबाबत तपास होणार आहे.   DGCA कडून विमानाच्या एअरवर्थिनेस आणि ऑपरेशनल कंडीशन याबाबत समांतर चौकशी सुरू झाली आहे.  तपासाअंती "ते" विमान उडण्यासाठी सुरक्षित होतं का याबाबत स्पष्टता येणार आहे.
या तपासणीला पुढील १० ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेकडून खाजगी विमान कंपनीच्या विविध कागदपत्रांचीही पडताळणी होणार आहे.
advertisement
विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत आला? 
दरम्यान, विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. VSR कंपनीबद्दलही गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणाची रोहित पवार आंतराष्ट्रीय गुप्तहेर संस्थेकडूनही तपास करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या विमानाचा ब्लॅक बॉक्स हा AAIB ने ताब्यात घेतला आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती काढण्याचं काम सुरू आहे. पण, डेटा येण्यास उशीर होणार असल्याची शक्यता आहे.  तर दुसरीकडे VSR Ventures या विमान कंपनीची देखील चौकशी सुरू आहे.
advertisement
मागील आठवड्यात  केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, लवकरच प्राथमिक अहवाल समोर येईल, असं आश्वासन दिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar: अजित पवार विमान अपघात प्रकरण नवी अपडेट, 'त्या' विमानाची कुंडली येणार समोर
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement