त्याने केलेले रोल काढून बघा, मला फॉलो केलंय! लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल थेटच बोलले अशोक सराफ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची खास मैत्री होती. दोघांनी अनेक लोकप्रिय सिनेमांत एकत्र काम केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अशोक सराफ पुढे म्हणाले, "फार लवकर गेला होता.नाहीतर त्याने बरंच काही केलं असतं. त्याचा ड्रॉबॅक एवढाच झाला की तो कॉमेडी तर कॉमेडीच घेऊन बसला. त्याने व्हरायटी काहीच केली नाही. आम्ही दोघांनी मिळून 50 सिनेमात एकत्र काम केलं. तो माझ्याबरोबर नेहमी सहाय्यक होता. मी हिरो तर तो माझा भाऊ, ड्रायव्हर किंवा आणि कोणी. त्याची एक वेगळी स्टोरी सिनेमात असायची."
advertisement
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या काळात मराठी सिनेसृष्टी गेली होती. यावर अशोक सराफ म्हणाले, "ज्यावेळेस राजा परांजपे, मास्टर विनायक काम करायचे ती वेगळी स्टाइल होती. ती हळू हळू कमी होत गेली. पिढी बदलली तसे विनोद बदलले, अँक्शन बदलत गेल्या. जमाना फास्ट झाला. त्यावेळेला आम्ही खुसलो. आम्ही लोकांना थिएटरमध्ये येण्यासाठी भाग पाडलं. लोक त्यावेळेस थिएटरला यायचे."









