advertisement

बँकेतील डेप्युटी मॅनेजर काय करू शकतो? तुम्ही स्वप्नात देखील विचार करू शकणार नाही; लॉकरमधून गुपचूप बाहेर काढली 4 कोटींची वस्तू

Last Updated:

Bank Locker: बेंगळुरूमध्ये बँकेच्या डेप्युटी मॅनेजरवर ग्राहकांच्या सुमारे 4 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांचा गैरवापर करून ते विनापरवानगी गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप असून त्याला अटक करण्यात आली आहे.

News18
News18
बेंगळुरू: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी एका बँकेच्या डेप्युटी मॅनेजरला ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांचा गैरवापर करून ते विनापरवानगी गहाण ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात एकूण 2,780 ग्रॅम सोने असल्याचे समोर आले असून, त्याची किंमत 4 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे.
या कथित गैरव्यवहाराचा भांडाफोड 5 फेब्रुवारी रोजी झाला. जेव्हा बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांनी गिरिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आरोपी अधिकाऱ्याने वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता बँकेतील लॉकरमधून सोने काढले आणि ते एका खासगी वित्तीय कंपनीकडे गहाण ठेवले. या माध्यमातून मिळालेली रक्कम ऑनलाइन सट्टेबाजीमध्ये खर्च केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
advertisement
2 फेब्रुवारी रोजी ही चोरी उघडकीस आली. एका महिला ग्राहकाने आपले गोल्ड लोन पूर्ण फेडून दागिने परत घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असता, तिच्या काही दागिन्यांचा अभाव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
आरोपीचे नाव किरण कुमार ई. असून तो इंडियन बँकेच्या गिरिनगर शाखेत कार्यरत होता. बँकेचे मुख्य व्यवस्थापक दिलीप कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 (विश्वासघाताचा गुन्हा) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
दक्षिण विभागाचे पोलिस उपायुक्त लोकेश बी. जगलासर यांनी सांगितले की, आरोपी डेप्युटी मॅनेजरला अटक करण्यात आली असून चोरी गेलेले सोने परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे 700 ग्रॅम सोने जप्त करण्यात यश आले आहे. मात्र संबंधित वित्तीय संस्थांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. आवश्यक असल्यास न्यायालयात धाव घेऊन त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
दरम्यान पोलिसांनी ग्राहकांना बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची सुरक्षितता आणि स्थिती यांची वेळोवेळी पडताळणी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
बँकेतील डेप्युटी मॅनेजर काय करू शकतो? तुम्ही स्वप्नात देखील विचार करू शकणार नाही; लॉकरमधून गुपचूप बाहेर काढली 4 कोटींची वस्तू
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement