अमरावती : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचा कोरडी झाली की, सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे ओठांना. ओठ कोरडे झाले की जेवण करण्यास त्रास होतो. आणखी बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यावेळी अनेक जण कलर असणाऱ्या लिपबाम वापरतात. वेगवेगळे प्रॉडक्ट सुद्धा वापरून बघतात. कलर असणाऱ्या लिपबाम ओठांसाठी हानिकारक असतात. पण ते सहज लक्षात येत नाहीत. हिवाळ्यात कलर असणाऱ्या लिपबाम ओठांना लावल्यास काय होऊ शकते? याबाबत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.\r\n



